शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

By admin | Updated: May 19, 2017 23:41 IST

‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने आक्रमक झाले. पोलिसांच्या सुरक्षेचे कवच तोडून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची पळापळ झाली. काळे झेंडे दाखविणाऱ्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यकर्ते सकाळपासून नजरकैदेत ठेवूनही हे आंदोलन झाले. संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले (तिघे रा. समडोळी) व महावीर पाटील (नांद्रे, ता. मिरज) अशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांना सोडून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते होणार होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, उसाला हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी’सह अनेक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला होता. हा दौरा शांततेत पार पडावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची दोन दिवसांपासून पळापळ सुरू होती. आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. शुक्रवारी सकाळपासून विलिंग्डन महाविद्यालय ते विजयनगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. विजयनगरकडे येणाऱ्या लहान-मोठ्या कच्च्या रस्त्यांवरही पोलिस बंदोबस्त होता. वरिष्ठ अधिकारी परिसरात लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री फडणवीस दुपारी साडेबाराच्या सुमारास विजयनगर येथे आले. तेथील कार्यालयाचे उद्घाटन करून ते इमारतीच्या आत गेले. तेथून ते काही वेळातच बाहेर आले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले, महावीर पाटील अचानक पोलिसांच्या सुरक्षेचे कवच तोडून फडणवीस यांच्यासमोर आले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. त्यांनी या चौघांना ताब्यात घेऊन पोलिस गाडीत घालून तेथून हलविले. हा प्रकार पाहून फडणवीस तातडीने मोटारीत बसून पुढील दौऱ्यासाठी मिरजेला रवाना झाले. महेश खराडेंसह सातजण नजरकैदेतमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, शहाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, मधुकर डिस्ले, भागवत जाधव या सातजणांना पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर नजरकैदेत ठेवले होते. खराडे यांना विश्रामबाग पोलिसांनी सांगलीत ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तासगाव पोलिस ठाण्यात बसविण्यात आले होते. अन्य सहा कार्यकर्त्यांना इस्लामपूर व शिराळा पोलिस ठाण्यात बसविले होते. सायंकाळी मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातून रवाना झाल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.