शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख विराजमान

By admin | Updated: March 21, 2017 15:42 IST

उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांची निवड

आॅनलाईन लोकमतसांगली : अखेर सांगली जिल्हा परिषदेतही भाजपने मंगळवारी सत्ता हस्तगत केली. शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांच्या मदतीने भाजपने सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग मोकळा केला. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल संग्रामसिंह देशमुख यांना ३५ आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या सुहास बाबर यांना ३५ मते मिळाली. विरोधी काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना २५ आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांना २५ मते मिळाली. आज दुपारी तीन वाजता ही निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर जल्लोष करण्यात आला. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ३५ संख्याबळ असल्याचा दावा केला होता, तो खरा ठरला. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांना या निवडणुकीत अपेक्षित संख्याबळ गाठता आले नाही. मंगळवारी सकाळपासूनच सांगलीत वेगवान राजकीय हालचाली झाल्या. महाबळेश्वर येथे सहलीवर गेलेले भाजपचे २0 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. तेथून त्यांनी थेट अध्यक्ष निवडीपूर्वी सांगलीत गाठली.दरम्यान, आमदार पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील आदी उपस्थित होते. भाजपने सकाळीच पोलिस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी करावयाच्या तडजोडींचे अधिकार संजयकाकांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संजयकाकांनी शिवसेना, घोरपडे गटाशीही चर्चा केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पदांचीही आॅफर दिली होती. भाजपला या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही बाबर यांना चर्चेला बोलाविले. (प्रतिनिधी)