शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:03 IST

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ...

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केला.देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना रासपने पाठिंबा दिल्याचे सांगून जानकर म्हणाले की, गत लोकसभेवेळी एक जागा रासपला दिली होती, तर विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाही आम्ही बारामती, माढा मतदारसंघाची मागणी केली होती. युद्धात आम्ही हरलो असलो, तरी तहात जिंकलो आहे. पक्षाचे दोन आमदार, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ नगराध्यक्ष आहेत. पुढील विधानसभेवेळी जागा वाढवून घेऊ.मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याबाबत जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा समाजातील तरुणांचे जीव वाचविण्यासाठी मी, फडणवीस, पंकजा मुंडे आंदोलकांना भेटलो, तेव्हा असे आश्वासन दिले होते. पण चळवळीत बोलणे वेगळे व संसदीय कार्यपद्धती वेगळी असते, याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणही लटकू नये, यासाठी सर्व अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार यात शंका नाही.भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला मी ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली जाणार आहे, असेही जानकर म्हणाले.मला गुलाल नाही, तरीही समाधानलोकसभेच्या तीन ते चार निवडणुका मी लढविल्या. अगदी सांगलीतूनही निवडणूक लढलो आहे. पण मला कधीच गुलाल लागला नसला तरी, नाराज नाही. समाजाला प्रकाश देण्याचे काम आपण केल्याचे जानकर म्हणाले.पडळकरांचा विषय संपलागोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारता ते म्हणाले की, ते माझ्यासोबत होते, तेव्हा कौतुक करीत. आता विरोधात गेल्यावर टीका करणारच. रासपमधून गेल्यानंतर माझ्यासाठी त्यांचा विषय संपला आहे. त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही.