शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:45 IST

सांगली : ‘पटक देंगे, युती गेली चुलीत’, म्हणणारे आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत ...

सांगली : ‘पटक देंगे, युती गेली चुलीत’, म्हणणारे आज गळ्यात गळे घालून फिरत आहेत. या भाजप-सेना युतीने महाराष्ट्र चुलीत घातला आहे. सबका विकास होण्याऐवजी केवळ मोदींचाच विकास झाला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत भाजप-शिवसेनेचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ असून, त्यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी आ. पी. एन. पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार उपस्थित होते.चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत देश लुटला आहे. त्यामुळेच ‘चौकीदार चोर है’असे लोक म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनेही जनतेची फसवणूक केली आहे. कर्जमाफीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणणाऱ्यांपासून मुलींना वाचविण्याची वेळ आली आहे. सतत अभ्यास करणारे फडणवीस परीक्षेत नापास झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राज्यात अंडरकरंट आहे. जनता भाजपची सत्ता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.विशाल पाटील माझी परवानगी घेऊनच स्वाभिमानीतर्फे निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात वसंतदादांची पुण्याई अजूनही संपलेली नाही. ते या निवडणुकीत बॅटने षटकार लगावतील. मोदी, फडणवीस यांंना संसदेत मान हलविणारे खासदार हवे आहेत. काम करणारा का नको, असा सवालही चव्हाण यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबळ लोकशाहीसाठी घटना लिहिली. त्यांच्याच नातवाने एमआयएम या जातीयवादी पक्षासोबत युती केली आहे. हे सारे पाहून बाबासाहेबही ढसाढसा रडत असतील. त्यांनी लोकशाहीचा खून केला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता सुशीलकुमारशिंदे यांनी केली. विश्वजित कदम म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी विशाल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे विश्वजित काय करणार, असे लोक विचारत होते. पण पलूस-कडेगावमधून विशालला मताधिक्य देणार आहोत. विशाल पुन्हा चुकला, तर अशोक चव्हाण यांनी त्याचा कान पिळावा.विशाल पाटील म्हणाले की, वसंतदादांच्या सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देशात व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. पाणी, उद्योग, रोजगार हे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरलो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी स्वागत केले. यावेळी आ. रामहरी रूपनवर, प्रकाश सातपुते, आनंदराव मोहिते, नितीन गोंधळे, कमलाकर पाटील, मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, वर्षा निंबाळकर, सुरेश शेंडगे, नामदेवराव मोहिते उपस्थित होते.वसंतदादांचा पुतळा झाकलास्टेशन चौकात भाजपच्या सभेवेळी वसंतदादा पाटील यांचा पुतळा झाकण्यात आला होता. त्यावर विशाल पाटील म्हणाले की, दादांचा पुतळा झाका, फोटो काढून टाका; पण त्यांचे विचार जनतेच्या मनात रूजले आहेत, ते कसे काढणार? हाच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी शासनाने साजरी करायला हवी होती. सांगलीत येऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायला हवा होता. पण त्यांचे पुतळे झाकण्याचे काम भाजपने केले. त्यांना लाज कशी वाटत नाही?संसदेत दोनदाच तोंड उघडलेसुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापुरात गेल्यावेळी भाजपचा खासदार निवडून आला. त्याने पाच वर्षात संसदेत दोनदाच तोंड उघडले. एकदा शपथ घेताना आणि दुसºयांदा जांभई देताना, असे म्हणताच सभेत हशा पिकला. त्यावर व्यासपीठावरील महेश खराडे यांनी, सांगलीच्या खासदाराने तर कधीच तोंड उघडले नसल्याचा टोला लगावला.त्यांना जोड्याने मारले पाहिजे!मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग हिने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंचा अपमान केला. पण पंतप्रधान मोदी मात्र त्यांचे समर्थन करीत आहेत. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. शहिदांचा अपमान करणाºयांना जोडे मारले पाहिजेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक