शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर तीन वर्षे भाजपचाच डल्ला : दिलीपतात्या पाटील, ‘हल्लाबोल’मधून शासनाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:01 IST

सांगली : राष्टÑवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

सांगली : राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, ४ व ५ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन होत आहे. या आंदोलनातून सरकारच्या धोरणांचा, कारभाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. राज्यभरात आंदोलनाला जनता व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनता सरकारवर नाराज असल्याचाच हा पुरावा आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करीत असताना, अनेक नियम लावून जाणीवपूर्वक कर्जमाफीत अडचणी निर्माण केल्या. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दीड लाखांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी असल्यामुळे त्यांना या कर्जमाफीचा उपयोग झालेला नाही. शेतकºयांच्या जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले.शेतकºयांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रकारचे चुकीचे निर्णय घेण्यात आले. पेपरफुटीचे प्रकरणही याच सरकारच्या काळात घडले. इंधनात प्रचंड मोठी दरवाढ झाली. आजवरच्या इंधन दरवाढीत भाजप सरकारने विक्रम नोंदविला आहे. बेरोजगारीच्या बाबतीतही असाच विक्रम प्रस्थापित होत आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे बोगस आश्वासन सरकारने दिले. अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक घटकाला, क्षेत्राला अडचणीत आणले.

संपूर्ण राज्यभर अनागोंदी दिसत आहे. अशाप्रकारचा कारभार कधीही कोणत्या पक्षाने केला नाही. त्यामुळेच सर्व घटक आता राष्टÑवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनात सहभागी होत आहेत. सांगली जिल्ह्य ात होणाºया आंदोलनासही असाच प्रतिसाद लाभेल, याची खात्री वाटते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.देशमुखांवर आरोपसुभाष देशमुख यांनी सोलापूर महापालिकेच्या जागेवर डल्ला मारून त्याठिकाणी घर बांधल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर डल्ला मारल्याचा आरोप करणे म्हणजे विनोदच आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी यावेळी केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण