शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री दौऱ्याने भाजप रिचार्ज

By admin | Updated: January 1, 2017 22:59 IST

पाणी योजनांचे निमित्त : निवडणुकांचे नारळ फुटले

लखन घोरपडे ल्ल देशिंगकवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे शनिवारी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील टेंभू योजना, तसेच आगळगाव सिंचन योजनेसह विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नारळही फोडण्यात आले आहेत.सध्या तासगावप्रमाणे कवठेमहांकाळ तालुक्यातही खासदार पाटील यांनी जोरदार एन्ट्री केली असून विविध विकास कामांचे नारळ फोडण्याचा धडाका लावला आहे. खासदार पाटील यांनी अगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढालगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार कार्यक्रम घेऊन अगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. तालुक्यात खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगाने वाढत आहे. त्यातच मागील नगरपंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले आहे. आता मात्र भाजप कवठेमहांकाळ तालुक्यात पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. तसेच एकाच वर्षात तब्बल दोनवेळा मुख्यमंत्री फडणवीस यांचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे या दौऱ्याचे फलित काय मिळणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.सत्ता मिळविण्यासाठी कायमच राजकारण्यांकडून पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा बनविण्यात येतो. त्याप्रमाणे आताही खासदार पाटील यांनी पाणी योजना मार्गी लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच तालुक्यात आणले. तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, पाणी प्रश्नावर तेही आक्रमक होत आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट मात्र अजून सावध पवित्र्यात आहे. दरम्यान, ढालगाव येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जनता भाजपबरोबर राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करताना, तालुक्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीबरोबर घोरपडे गट एकत्र आला आहे, तर त्यांना कडवे आव्हान देण्यासाठी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर भाजपला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तालुक्यात कितपत यश मिळणार, हे आगामी काळच ठरविणार आहे. फूट कायम : घोरपडे भाजपपासून दूरच खासदार संजय पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील दुही वाढतच चालली आहे. एकीकडे खासदार पाटील तालुक्यात जोरदार लक्ष घालत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हाक्के यांना जवळ करीत भागात आपली पकड मजबूत करीत आहेत, तर दुसरीकडे भाजपमध्ये असूनही घोरपडे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूरच राहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये घोरपडे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.