शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनचे कार्यालय स्थलांतरास भाजपचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा, नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, नसीमा नाईक, उर्मिला बेलवलकर, सुनंदा राऊत या नगरसेविकांनी गुरुवारी अग्निशमन दलाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर शिंदे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक सोळामधील रेवणी रस्त्यावर महापालिकेचे अग्निशमन कार्यालय आहे. हे कार्यालय स्टेशन चौकातील जागेत स्थलांतर केले आहे. याबाबत नगरसेवकांना कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही. कापडपेठ, गणपती पेठ, बुरुड गल्ली, मारुती रस्ता, गावभाग, खणभाग, वखारभाग हा परिसर दाट वस्तीचा, तसेच व्यापार-उद्योगाचा आहे. त्यामुळे भविष्यात आपत्ती घडल्यास अग्निशमनच्या गाड्या पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच कृष्णा नदीलगतच्या भागामध्ये दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात पूर येत असतो. पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचेच कर्मचारी मदतकार्य करीत असतात. त्यामुळे कृष्णा नदीलगतच्या भागापासून देखील रेवणी रस्ता जवळ आहे. याचा विचार करून रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेतच नवे फायर स्टेशन बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.