शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी भाजप महाडिकांच्या दारात

By admin | Updated: February 24, 2017 23:56 IST

राजू शेट्टीही दूरच; अजितराव घोरपडे दोन दिवसांत निर्णय घेणार; राजकीय हालचालींना वेग

सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर रयत विकास आघाडीचे तीन सदस्य भाजपबरोबर जाण्यास बांधील नसल्याचे राहुल महाडिक यांनी गुरुवारी जाहीर करताच भाजप नेत्यांची झोप उडाली. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यात भाजप नेत्यांचा शुक्रवारचा दिवस गेला. खा. राजू शेट्टी यांनीही भाजपपासून फारकत घेतली असून, अजितराव घोरपडे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ भूमिकेत आहेत. जिल्हा परिषदेत ६० सदस्य असून, सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. भाजपकडे २५, राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, शिवसेना तीन, रयत विकास आघाडी चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, अपक्ष एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या आणि रयत विकास आघाडीच्या चार, अशा २८ जागा आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र रयत विकास आघाडीत नानासाहेब महाडिक यांचे तीन आणि वैभव नायकवडी गटाचा एक सदस्य आहे. नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी, आमचे तीन सदस्य भाजपला पाठिंबा देण्यास बांधील नाहीत, जो पक्ष सन्मानाची वागणूक देईल, त्यांना पाठिंबा देणार आहोत, असे जाहीर करून गुरुवारी खळबळ उडवून दिली होती. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही एक सदस्य असून त्यांनीही भाजपबरोबर जाणार नाही, असे जाहीर केले आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अद्याप पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कारण मुंबई महापालिकेतील भाजप-सेना युतीवर बाबर गटाचा निर्णय अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यात अडथळे येत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.दिवसभरात पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आमदारांच्या राजकीय हालचालींना वेग आला. महाडिक गटाची समजूत काढण्यासाठी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी धाव घेतली होती. महाडिक गटाशी चर्चा करून समजूत काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.याबाबत माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, आमच्या गटाचे दोन सदस्य असून कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबद्दल निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही पराभवाचे चिंतन करीत असून, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल काहीच निर्णय झालेला नाही.रयत विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार रद्दरयत विकास आघाडीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पेठ (ता. वाळवा) येथे शुक्रवारी होणार होता. याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी येणार होते, पण ते गैरहजर राहिल्यामुळे कार्यक्रमच रद्द करण्यात आला. यावरून खासदार शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. आघाडीच्या चार सदस्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सदस्याचा भाजपला पाठिंबा देण्यात गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे.