शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचा धनगर समाजाकडून निषेध

By admin | Updated: April 1, 2017 11:51 IST

शब्द फिरविणाऱ्या मोदींना सद्बुध्दी देण्याचे सांगलीत गणपतीला समाजबांधवांकडून साकडे

आॅनलाईन लोकमतसांगली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी समाजात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांनी तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आरक्षण देण्याच्या घोषणा देऊन समाजाची मते आणि सत्ताही मिळविली. निवडणुकीनंतर मात्र मोदी आणि फडणवीस हे आरक्षण देता येत नसल्याचे सांगून धनगर समाजाची फसवणूक करीत आहेत. याबद्दल समाजबांधवानी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून निषेध केला. तसेच मोदींना सद्बुध्दी देण्याचे साकडेही समाजबांधवांनी सांगलीतील गणपतीला घातले.दिल्लीत गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छात्तीसगडच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये धनगर समाजाचे आरक्षण आणि ओबीसी मंत्रालय या मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील खासदारांनी धनगर समाज शब्दातील घोळ दूर करून देशताील इतर धनगर समाजाप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीकडे मोदी यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती भाजप खासदारांकडूनच समाजबांधवांना मिळाली आहे. मोदी यांनी आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप समाजातील तरूणांनी केला.सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील युवकांनी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. मोदी आणि फडणवीस सरकार धनगर समाजाला न्याय देईल, अशी अपेक्षा होती. परंतु, भाजप सरकार सत्तेवर येऊन अडीच ते तीन वर्षे झाली, तरीही धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. उलट मोदी आणि फडणवीस यांच्याकडून समाजाला आरक्षण कसे देता येत नाही, अशीच विधाने केली जात आहेत. यामुळे समाजाची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. याबद्दल सांगली जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोदींच्या विधानाबद्दल सांगलीतील गणपती मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांनी आरती करून, त्यांना सद्बुध्दी देण्याचे तसेच निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्याचेही साकडे घातले. त्यानंतर गणपती पेठेत भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.यावेळी नगरसेवक विष्णू माने, अमर पडळकर, सुरेश टेंगले, अमित पारेकर, संदीप टेंगले, अजित दुधाळ, आनंद लेंगरे, भारत खांडेकर, विनायक कोळेकर, भारत व्हनमाने, हरिदास लेंगरे, रामभाऊ मासाळ यांच्यासह शेकडो तरूण आंदोलनात सहभागी होते.धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची उद्या बैठकधनगर समाजाच्या आरक्षणाकडे भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या प्रश्नावर आंदोलन छेडण्यासाठी जिल्ह्यातील धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रविवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सांगलीतील विजयनगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती विष्णू माने व सुरेश टेंगले यांनी दिली.