शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जत तालुकाध्यक्षांवर नगरसेवकाचा हल्ला : व्हसपेठजवळ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:45 IST

भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी (वय ४०, रा. सिध्दार्थ कॉलनी, जत) यांच्यावर भाजपचेच नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत (वय ३५, रा. विजय कॉलनी, जत) व अमीर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एका अनोळखीने दगड व काठीने प्राणघातक

ठळक मुद्देयाप्रकरणी शनिवारी जत पोलिसांत गुन्हा दाखल चंद्रकांत गुड्डोडगी जखमी; उमेश सावंत यांच्यावर गुन्हादगडफेक करीत गाडीच्या सर्व काचा फोडल्या

जत : भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी (वय ४०, रा. सिध्दार्थ कॉलनी, जत) यांच्यावर भाजपचेच नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत (वय ३५, रा. विजय कॉलनी, जत) व अमीर (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एका अनोळखीने दगड व काठीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवार, दि. ५ सप्टेंबररोजी पहाटे तीन वाजता व्हसपेठ-कोळगिरी रस्त्यावर व्हसपेठपासून तीन किलोमीटरवर घडली. याप्रकरणी शनिवारी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रकांत गुड्डोडगी व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वास्टर (वय ३८, रा. जत) हे दोघे मोटारीतून (क्र. एमएच १० बीएम ४३९२) बालगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून परतत असताना उमेश सावंत व अमीर आणि अन्य एक अनोळखी असे तिघे विनाक्रमांकाची मोटार घेऊन व्हसपेठजवळच्या डोंगर परिसरात आडवे येऊन थांबले होते. गुड्डोडगी यांची गाडी आल्यानंतर त्यांनी जोरदार दगडफेक करीत गाडीच्या सर्व काचा फोडल्या. गुड्डोडगी गाडीच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या डोक्यात, कपाळावर, दोन्ही हात व पायावर काठ्यांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गुड्डोडगी गंभीर जखमी झाले. सुनील वास्टर यांनाही मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर गुड्डोडगी यांच्यावर मिरज व जत येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.पक्षांतर्गत वाद की वाळू व्यवसायातील संघर्ष?चंद्रकांत गुड्डोडगी व उमेश सावंत हे दोघेही सुसलाद (ता. जत) येथील रहिवासी आहेत. या दोघांमध्ये पूर्वीपासून गावपातळीवरील राजकारण व पक्षांतर्गत वाद आहेत. याशिवाय दोघांचाही वाळू व्यवसाय आहे. व्यवसायातील संघर्षातून ही घटना घडल्याची चर्चा जत तालुक्यात आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMurderखून