शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सांगलीत जकात नाक्याच्या जागेबाबत भाजप-कॉँग्रेसची मिलीभगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:29 IST

muncipalty carporation, sangli सांगली महापालिकेच्या बंद असलेल्या जकात नाक्याच्या मोक्याच्या जागा उपसूचनांद्वारे भाडेपट्टीने देण्याचा ठराव महासभेत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय सदस्य वादाच्या भोवऱ्यात प्रलंबित विषयात उपसूचनांद्वारे घुसडले ठराव

सांगली : महापालिकेच्या बंद असलेल्या जकात नाक्याच्या मोक्याच्या जागा उपसूचनांद्वारे भाडेपट्टीने देण्याचा ठराव महासभेत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चर्चा दुसऱ्याच विषयावर आणि ठराव मात्र वेगळाच करून भाजपने पारदर्शी कारभाराचा नमुनाच सादर केला आहे. त्यामुळे जुने जकात नाके भाडेपट्टीने देण्याचा ठराव वादाच्या भोवऱ्यात सापडला असून महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांचे ह्यमिल बांट के खाओह्ण सुरू आहे.मार्च महिन्यात झालेल्या ऑनलाईन महासभेवेळी अजेंड्यावर बेडग रोडवरील कचरा डेपोची जागा हाडे साठविण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा विषय होता. हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. पण या विषयात काँग्रेस, भाजपच्या सदस्यांनी उपसूचना देत, जकात नाक्यांची जागा भाडेपट्टीने देण्याचा ठराव करून घेतला.

या ठरावावर महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर यांच्या सह्या आहेत, तर काँग्रेसचे संतोष पाटील, भाजपचे गजानन मगदूम, अप्सरा वायदंडे यांनी उपसूचना दिल्या होत्या.माधवनगर व कोल्हापूर रोडवरील जकात नाक्याची जागा भाडेपट्टीने देण्याचा ठराव करण्यात आला. त्यासाठी दिव्यांगांचा आधार घेतला आहे. पाच टक्के जागा दिव्यांगांना देण्यात याव्यात असे आदेश आहेत. त्यानुसार या दोन्ही जागा दिव्यांगांना देण्याची सूचना करण्यात आली.

केवळ या दोनच दिव्यांगांनी जागेची मागणी केली होती का? त्यांनाच भाडेमूल्य निश्चित करून जागा देण्याचा ठराव लपवाछपवी करून का? केला? प्रलंबित विषयात उपसूचनांद्वारे दुसरेच ठराव करता येतात का? याची उत्तरे आता भाजपला द्यावी लागणार आहेत.कुपवाड ग्रामपंचायतीची जागा एका व्यक्तीला देण्यात आली होती. १९८४ पासून ती संबंधित व्यक्तीच्या ताब्यात आहेत. महापालिका झाल्यावर जागेच्या भाडेपट्टीबाबत लेखी करार झालेला नाही. आता ही जागा एकाऐवजी दोन व्यक्तींच्या ताब्यात भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव गजानन मगदूम यांनी दिला. तसा ठरावही करण्यात आला. त्यामुळे उत्पन्नवाढ, दिव्यांगांचा विकास या गोंडस नावाखाली सत्ताधारी व विरोधी पक्षाने मिल बांट के खाओचा फंडा अवंलबला असल्याचे दिसून येते.लोकमतचा प्रकाशझोतबंद जकात नाक्यांवर नगरसेवकांचा डोळा या मथळ्याखाली सोमवारी ह्यलोकमतह्णने वृत्त प्रसिद्ध केले होते. अनेक नगरसेवकांना या ठरावाबाबत कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे वृत्त प्रसिद्ध होताच नगरसेवकांनी ठरावाची प्रत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण ठरावाबाबत पालिकास्तरावर गोपनीयता बाळगण्यात आली होती. अखेर बुधवारी हा ठराव समोर आलाच.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली