शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी ती आली बेल्जियमहून

By admin | Updated: April 15, 2016 00:50 IST

खटावच्या माहेरवाशिणीची कहाणी : परदेशी पतीही वातावरणाने भारावला--गावकऱ्यांनाही त्यांचे अप्रूप

प्रताप महाडिक-- कडेगाव --आयुष्यभराचे सोबती झालेले ‘ते’ दोघे बेल्जियमहून थेट ‘तिच्या’ माहेरी खटाव तालुक्यात आले, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीसाठी! गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आलेले हे जोडपे भेटले कडेगाव-खटावच्या सीमेवर. स्वाती कांबळे आणि पप्पेन हंसेन्स हे या दाम्पत्याचे नाव. स्वातीच्या मनात असलेली बाबासाहेबांच्या जयंतीची आस पाहून पप्पेन भारावून गेले...पूर्वाश्रमीची स्वाती मुकंद कांबळे ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधच्या पायथ्याशी असलेल्या त्रिमली या गावची. तिचा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. वडील गिरणी कामगार. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेतले. बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेली स्वाती कधीच खचली नाही. बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र तिला गप्प बसू देत नव्हता. मुंबई येथे निर्मला निकेतनमधून पदवीधर झालेली स्वाती पुढील शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली. तत्पूर्वी भारतीय दलित महिलांवरील अन्याय-अत्याचाराने ती सुन्न झाली होती आणि तोच तिच्या अभ्यासाचा विषयही झाला. स्वित्झर्लंड येथे जीनिव्हा विद्यापीठात ती सध्या पीएच.डी. करीत आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील दलित महिलांवरील अन्याय, अत्याचाराबाबत तिने सर्वेक्षण करून प्रबंध सादर केला आहे. दरम्यान, तिला स्वित्झर्लंडमध्ये बेल्जियम येथील पप्पेन हंसेन्स भेटले. स्वातीच्या बेल्जियममधील मैत्रिणीने पप्पेन यांची ओळख करून दिली. ओळखीचे प्रेमात आणि प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले. पप्पेनशी तिने १२ डिसेंबर २०१५ रोजी तेथेच नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर नुकताच म्हणजे १५ दिवसांपूर्वी मुंबई येथे बौद्ध पध्दतीने विवाह केला. या विवाहास दोघांच्याही नातेवाईकांनी पाठिंबा दिला. बेल्जियम सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या पप्पेन यांना सामाजिक कार्याची विलक्षण आवड आहे. रात्रंदिवस ते बालकामगारांच्या प्रश्नात व्यस्त असतात. भारतातील संस्कृतीने आपण भारावून गेल्याचे ते सांगतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेशी आपण स्वातीमुळे जोडलो गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वेळ व्यतित करायचा, असे ठरवून दोघेही त्रिमलीला भेट देण्यासाठी आले होते. (वर्ताहर)कडेपूर-पुसेसावळी रस्त्यावर कडेगाव-खटाव तालुक्याच्या सरहद्दीवर एका कालव्यात पप्पेन यांना पोहण्याचा मोह टाळता आला नाही. गुरुवारी सगळीकडे निर्माण झालेले ‘भीममय’ वातावरण पाहून आणि स्वातीची आस पाहून ते भारावून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जगभरात रुजण्याची गरज आहे, असे पप्पेन व स्वाती यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोघांनाही समाजसेवा करून बालकामगारांचे अश्रू पुसायचे आहेत. त्यांच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालायची आहे. त्यांच्या या जिद्दीचे कडेगाव-खटाव तालुक्यातील गावकऱ्यांना अप्रूप वाटले नसते तरच नवल!