शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नोकरभरतीमध्ये झाला सर्वात मोठा गोलमाल...

By admin | Updated: November 25, 2014 23:48 IST

शासनाला ठेंगा : परीक्षा, मुलाखती न घेताच पदे बहाल

अविनाश कोळी -सांगली -गैरव्यवहारांच्या कोट्यवधी रुपयांच्या उड्डाणात सर्वाधिक गोलमाल नोकरभरतीत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शासनाला, सहकार विभागाला न जुमानता तब्बल ६0 शिपाई आणि ३५ लिपिकांची भरती बेकायदेशीररित्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतीही तोंडी अथवा लेखी परीक्षा न घेता करण्यात आलेली ही भरती म्हणजे सर्वात मोठा घोटाळा आहे. नोकरभरतीतील अर्थकारण आता देशाच्या कानाकोपऱ्यात मुरले आहे. प्रत्येकाला नोकरभरतीमागचे गणित माहीत असते. म्हणूनच प्रत्येक ठिकाणच्या भरती प्रक्रियेकडे प्रथम शंकेने पाहिले जाते. याचाच परिणाम म्हणून आता भरती प्रक्रियेवेळी कोणत्याही आमिषाला, अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासकीय पातळीवर केले जाते. तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेने २00१ मध्ये केलेल्या भरतीत सर्व शंकांना सत्यात उतरविताना बेकायदेशीर गोष्टींना धडधडीत अंमलात आणले. याबाबतचे ताशेरेही चाचणी लेखापरीक्षणात ओढण्यात आले होते. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने १२ जून २00१ रोजी ठराव क्रमांक ४ (७) नुसार २५ लोकांना शिकाऊ शिपाई म्हणून नियमबाह्यरित्या नियुक्त केले. त्यांना नंतर कायमही करण्यात आले. त्याचवेळी संचालक मंडळाने तात्पुरती व्यवस्था म्हणून ७८ लोकांना रोजंदारीवरील शिकाऊ लिपिक व १९ लोकांना रोजंदारीवरील शिपाई या पदांवर घेतले. नियुक्त कालावधीपेक्षा त्यांना जास्त संधी देण्यात आली. भरतीसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. लेखी अथवा तोंडी परीक्षा पद्धतीला फाटा देण्यात आला. शासनाने १३0 लिपिकांच्या पदांसाठी परवानगी दिली असताना, बँकेने १३८ लिपिक नियुक्त केले. त्यामुळे नोकरभरतीच्या माध्यमातून नियमांच्या सर्वाधिक चिंधड्या उडविण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २00१-0२ ते २0११-१२ या कालावधित झालेल्या अनेक गैरव्यवहारांची लक्तरे आता चौकशी अहवालाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या वेशीवर टांगली गेली आहेत. मनमानी कारभार, मर्जीतल्या लोकांवर, ठेकेदारांवर केलेली कृपादृष्टी, शासनाला, सहकार विभागाला तसेच नियमांना ठेंगा दाखवून सर्रास बेकायदेशीर कामांवर केलेले शिक्कामोर्तब, अशा सर्व गोष्टी आता कलम ८३ च्या चौकशीतून उजेडात आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा सविस्तर पंचनामा वाचा आजपासून....या नियमांना दिला फाटासेवायोजना, समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून याद्या मागविणेमागासवर्गीयांना भरतीत प्राधान्य देणेअंध, अपंग अनुशेष भरणेलिपिक पदासाठी विद्यापीठाचा पदवीधर व शिपाई पदासाठी आठवी पास अशी शैक्षणिक पात्रतामागासवर्गीयांची रोस्टरनुसार आकडेवारी ठेवणे भरतीबाबतचे शासन आदेश पाळणेनियमानुसार उमेदवारांचे वय व शैक्षणिक पात्रता यांची बॅँकेने खात्री करणेशासनमान्यता व भरतीशासनाची मान्यता बँकेची भरतीलिपिक शिपाई लिपिक शिपाई १00 ४0 १६५ १00सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी ४0 शिपाई पदांच्या भरतीला परवानगी दिली असताना बॅँकेने २५ शिपाई भरले. म्हणजे मंजुरीपेक्षा १५ कमी भरती केली. नंतरच्या कालावधित १५ ऐवजी ४२ शिपाई भरती केले. त्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही. २0 डिसेंबर २00६ च्या ठराव क्रमांक ५ (१३) अन्वये २00२ पासून रोजंदारीवर असलेल्या १८ शिपाई व २७ लिपिकांना कायम करण्यात आले. या भरतीलाही शासनाची मंजुरी नाही. लेखी व तोंडी परीक्षाही घेतली नाही.