शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय संस्थांकडून मोठा भ्रष्टाचार-सुनील फराटे यांचा आरोप : शंभर कोटींचा अपहार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:58 IST

जिल्ह्यात २००७ पासून मंजूर झालेल्या ४५ मागासवर्गीय संस्थांपैकी बहुतांश संस्था संचालकांनी खोट्या सभासद नोंदणीद्वारे सुमारे शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.

ठळक मुद्देसर्वच संस्थांच्या चौकशीची मागणी

सांगली : जिल्ह्यात २००७ पासून मंजूर झालेल्या ४५ मागासवर्गीय संस्थांपैकी बहुतांश संस्था संचालकांनी खोट्या सभासद नोंदणीद्वारे सुमारे शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. या सर्व संस्थांची, त्यांच्याकडील नोंदणी व अनुदानाची चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या कागदपत्रांद्वारे मागासवर्गीय तरुणांच्या नावे संस्थाचालकांनी केलेली बोगसगिरी समोर येत आहे. यामधील काही संस्थांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्याचे पुढे काय झाले, हे कळाले नाही. ४५ संस्थांपैकी ज्या संस्था राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत, अशा काही संस्थाच चालू आहेत. एकाच्या नावे दोन-तीन संस्था मंजूर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मागासवर्गीयांच्या नावे संस्था मंजूर करून सर्वांनीच पैसे हडप केले आहेत. यासंदर्भात शेतकरी संघटनेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही फारसे काही झाले नाही. या सर्व प्रकारामध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे.

संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले हे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत. मागासवर्गीय तरुणांना या संस्थांचा लाभ होण्याऐवजी ठराविक लोकांनाच त्याचा लाभ होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. सातत्याने याबाबतचा पाठपुरावा आम्ही करू, असे त्यांनी म्हटले आहे. निवेदनावर रावसाहेब दळवी, रामभाऊ कणसे, वसंत भिसे, शीतल राजोबा, शंकर कापसे, समीर पाटील, नवनाथ पोळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.अधिकाºयांनी राजीनामा द्यावा!फराटे यांनी म्हटले आहे की, या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले व सहायक उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. चौकशीकरिता संघटनेला मिळालेल्या कागदपत्रांचा आधार घ्यावा. त्याचे अवलोकन संबंधित यंत्रणेने करावे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSangliसांगली