शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विट्यामध्ये शेतकऱ्यांची तक्रारीसाठी मोठी रीघ; ‘महारयत’कडून गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:49 IST

विटा : कडकनाथ कोंबडी व्यवसायात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, फसवणुकीची तक्रार करण्यासाठी विटा पोलीस ...

विटा : कडकनाथ कोंबडी व्यवसायात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, फसवणुकीची तक्रार करण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात रीघ लागली आहे. शनिवारी पुन्हा १४ शेतकºयांनी सुमारे ३१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यामुळे तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकºयांची संख्या आतापर्यंत ८३ झाली असून, रक्कम सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांवर पोहोचली आहे.इस्लामपूरच्या महारयत अ‍ॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी व्यवसायात भरघोस नफ्याचे आमिष दाखवून खानापूर तालुक्यातील शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. अनेकांनी कर्जे काढून या व्यवसायात रक्कम गुंतविली आहे. काहींना पक्षी मिळाले, तर काही पक्षी मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. तोपर्यंतच कंपनीचा बोºया वाजला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शुक्रवारअखेर खानापूर तालुक्यातील ६९ शेतकºयांनी १ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विटा पोलिसांत दिली होती. आज शनिवारी पुन्हा १४ शेतकºयांनी ३१ लाख ३० हजाराला कंपनीने गंडा घातल्याची तक्रार पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्याकडे दिली. त्यामुळे आतापर्यंत तक्रारी दाखल झालेली संख्या ८३ झाली असून, शेतकºयांना १ कोटी ४० लाख रुपयांना महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे फसविल्याचे उघडकीस आले आहे.सूत्रधार सुधीर मोहितेची अटकपूर्व जामिनासाठी धावइस्लामपूर : जगभरात सूत्रधार सुधीर मोहिते याने संभाव्य अटक टाळण्यासाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुधीर शंकर मोहिते याच्यासह गणेश हौसेराव शेवाळे यानेसुद्धा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होईल. कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना मालामाल करण्याचे आमिष दाखवत रयत अ‍ॅग्रो आणि महारयत अ‍ॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून राज्यासह परराज्यातील १० हजारांहून अधिक शेतकºयांना ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा मोहिते आणि त्याच्या साथीदारांनी घातला आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यापासून सूत्रधार सुधीर मोहिते फरारी झाला आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही तो हाताला लागलेला नाही. या घोटाळ्यातील संदीप मोहिते आणि हणमंत जगदाळे हे दोन संचालक सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.