बोरगाव : गौंडवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व बांधकामाचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इमारतीस ७ लाख ८५ हजार रुपये खर्च येणार आहे. या शाळेची इमारत सन २०१९ च्या महापुरात पडली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मोठे हाल होत होते. ही बाब गांभीर्याने घेऊन जितेंद्र पाटील यांच्या परिश्रमातून याला मंजुरी घेऊन या इमारतीस निधी उपलब्ध करून देण्यात आला.
यामुळे पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या भूमिपूजन समारंभास सरपंच योगेश लोखंडे, उपसरपंच जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव, विद्या कुंभार, माधुरी चव्हाण, पूनम निकम, रघुनाथ साळुंखे, तुषार चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, मारुती चव्हाण, सुभाष जाधव, दत्तू कुंभार, नामदेव जाधव, धनाजी भोसले, धनाजी लोखंडे, संदीप जाधव, संदीप चव्हाण, मानसिंग कुंभार मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.