शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ओपीडीचे जानेवारीत भूमिपूजन

By admin | Updated: December 28, 2015 00:34 IST

सांगली शासकीय रुग्णालय : बांधकामाच्या निविदेला मिळाली मंजुरी, आरोग्यमंत्र्यांना निमंत्रण

सांगली : गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील नव्या ओपीडीच्या बांधकामाची निविदा मंजूर झाल्याने पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ओपीडीच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. इमारत उभारणी, दुरुस्ती अशा कामांसाठी केंद्र शासनाने चार वर्षापूर्वी १८ कोटी रुपये सांगलीच्या शासकीय रुग्णालयास मंजूर केले आहेत. यापैकी साडेसहा कोटी रुपये नव्या ओपीडी इमारतीसाठी प्राप्तही झाले आहेत. सध्या हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्याहस्ते दोन वर्षापूर्वी ओपीडी इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतींच्या कामाचा प्रस्ताव तयार करुन तो वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविला होता. प्रशासकीय मंजुरीअभावी तेव्हापासून फाईल पडून होती. मंजुरी नसल्याने रितसर निविदा प्रक्रियाही करता येत नसल्याने हा निधी पडून होता. दोन महिन्यापूर्वी सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी रुग्णालयास भेट देऊन, ओपीडीचा विषय काढला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरु केले जाईल, असे सांगितले होते. पण तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी त्यास विरोध केला. मंजूर झालेला निधी मिरजेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ व आ. शिवाजीराव नाईक यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली. तावडे यांनी याप्रश्नी बैठक घेतली. बैठकीस त्यांनी खा. पाटील, आ. गाडगीळ, आ. नाईक व डॉ. डोणगावकर यांनाही आमंत्रित केले होते. त्यावेळी डोणगावकर यांना चांगलेच फैलावर घेऊन, ओपीडी कामात हस्तक्षेप न करण्याची सूचना करून, तातडीने काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या कामास गती आली.सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅक्टोबर महिन्यात या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. प्रारूप निविदा मंजुरीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सादर केली. त्यास मंजुरी मिळाली आहे. महिन्याभरात बांधकाम सुरु होईल, असे सांगण्यात आले होते. पुन्हा भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी तावडे यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दोन इमारती : अशा असतील सुविधानव्या ओपीडीच्या दोन इमारती असणार आहेत. यामध्ये दोन मजली रक्तपेढी, लिफ्ट सातत्याने बंद राहत असल्याने स्ट्रेचर रॅम्प तयार केला जाणार आहे. एमआरआय, सिटीस्कॅन व कलर एक्सरे, डॉक्टरांना मार्गदर्शन केंद्र, डोळे तपासणी, क्षयरोग कक्ष, त्वचारोग, लहान मुलांचा कक्ष, डोळे तपासणी, भूल कक्ष, दंत तपासणी, एआरटी सेंटर, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय रेकॉर्ड कक्ष, लहान मुलांवर शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा तपासणी, परिचारिका कक्ष आदी विभाग असणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.ुुदुसऱ्यांचा मुहूर्त काढलाआघाडी शासनाच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री विजयकुमार गावीत यांच्याहस्ते नव्या ओपीडीचे भूमिपूजन झाले होते. पण पुढे कोणतेच काम सुरु झाले नाही. आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक यांनी पाठपुरावा केल्याने अखेर पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्याचा मूहूर्त लागला आहे.