शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भिलवडी बाजारात ‘कृष्णे’च्या पुराचे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:09 IST

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे ...

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे पाणी घुसले. दिवसभर सुरू असलेला संततधार पाऊस आणि पुराची धास्ती यामुळे कृष्णाकाठच्या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.भिलवडी- अंकलखोपदरम्यानचा पूल बुडाल्याने कोल्हापूर-तासगाव, इस्लामपूर-तासगाव, सांगली ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली. भिलवडी-अंकलखोप या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच भिलवडी ते धनगाव रस्त्यावर पाणी आल्याने श्रीक्षेत्र भुवनेश्वरवाडीतील नागरिकांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. चोपडेवाडी, सुखवाडी या गावातील ओढ्यांमधून पुराचे पाणी शिरल्याने या गावांचा भिलवडी व परिसरातील गावांशी असणारा संपर्क तुटला आहे. भिलवडी-सरळी पुलाच्या बाजूस असणाऱ्या मौलानानगर वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. येथील शंभरावर कुटुंबांचे सेकंडरी स्कूल, भिलवडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळवाडी, भारती विद्यापीठ, खंडोबाचीवाडी या शाळांच्या इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांनी पूरग्रस्त भागास तसेच नागरिकांचे स्थलांतर केलेल्या शाळेच्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी भिलवडीच्या साखरवाडी, अण्णा भाऊ साठेनगर, पंचशीलनगरमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. धनगावमधील पूरग्रस्तांची जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सोय करण्यात आली. बाजार मैदानात पाणी शिरल्याने भिलवडीच्या आठवडा बाजारास फटका बसला.