शिरटे : बहे (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन व इस्लामपूर पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंच छायाताई पाटील व उपसरपंच प्रा. सुवर्णाताई पाटील यांनी ही माहिती दिली.
शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) अखेर होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री भैरवनाथाचे मंदिर देवदर्शनासाठी बंद राहील. तसेच देवाची पालखी व सासनकाठी काढण्यात येणार नाही, देवाची यथासांग पूजा विधिवत करण्यात येईल. मटण, चिकन दुकाने बंद चालू करता येणार नाहीत.
सर्वांनी घरी राहूया व हे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी श्री भैरवनाथ चरणी प्रार्थना करण्याचे आवाहन सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.