शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्ह्यात ७२०० रुग्णांना ‘१०८’ रुग्णवाहिकेचा लाभ

By admin | Updated: March 16, 2015 00:10 IST

या सेवेमुळे जिल्ह्यातील ७,२२८, तर राज्यातील २,०९,०४७ रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ मिळाला

संजय घोडे-पाटील - कोकरूड ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी जीवनदायी ठरलेली महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये २३, तर संपूर्ण राज्यामध्ये ९३७ रुग्णवाहिका काम करत आहेत. या सेवेमुळे जिल्ह्यातील ७,२२८, तर राज्यातील २,०९,०४७ रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ मिळाला असून, १०८ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक या सेवेला दिला आहे. ही आपत्कालीन रुग्णसेवा ग्रामीण भागातील नागरिकांना, गरोदर महिला व अपघात किंवा दुर्घटना घडलेल्या ठिकाणी वरदान ठरते. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास रुग्णवाहिका घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचते. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळण्याबरोबर शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टरांचे पथकही कार्यरत असल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.शिराळा तालुक्यामध्ये शिराळा, कोकरुड, नाठवडे याठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत असून, या सेवेसाठी ९ वैद्यकीय अधिकारी, सहा चालक असे १५ कर्मचारी काम करत असून, ही सेवा विनाविलंब २४ तास सुरू आहे.१०८ या क्रमांकावर विनाकारण ‘मिस कॉल’ दिला अथवा काहीही काम नसताना दूरध्वनी केला, तर कायदेशीर कारवाई केली जाते. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीतच १०८ क्रमांकावर दूरध्वनी करावा. घटनास्थळ, पत्ता व्यवस्थित सांगावा, सायरनचा आवाज येताच रस्ता खुला करावा, तसेच अपघातस्थळी डॉक्टरांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.‘लाईफ सेव्हिंग नेटवर्क’ रूग्णांसाठी जीवनदान ठरणाऱ्या योजनेस एक वर्ष पूर्ण सांगली जिल्ह्यात ७२०० रुग्णांना अखंडित मोफत सेवा१०८ या रुग्णवाहिकेतून २४ तास डॉक्टर व चालक सेवाजिल्ह्यात २३ रुग्णवाहिकांमुळे ‘लाईफ सेव्हिंग नेटवर्क’