शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus In Sangli : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी योजनांचा लाभ द्या  : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:37 IST

CoronaVIrus In Sangli : कोरोनाने ज्या बालकांचे आई, वडील यांचा मृत्यू झालेला आहे, अशा बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्दे कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी योजनांचा लाभ द्या  : जिल्हाधिकारी मालमत्तेच्या हक्काबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा :  डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोनाने ज्या बालकांचे आई, वडील यांचा मृत्यू झालेला आहे, अशा बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

कोरोनाने जिल्ह्यात सात बालकांच्या आई व वडील यांचा मृत्यू झालेला आहे. 27 बालकांच्या आईंचा मृत्यू झाला आहे. तर 274 बालकांचे वडील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत सर्वेक्षणात 370 बालके आढळून आली असून 308 बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल एनसीपीसीआरवर नोंद केले आहेत. उर्वरित बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल तातडीने पूर्ण करून कार्यवाही करावी, असे आदेश डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण हक्क समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, महानगरपालिका उपआयुक्त राहूल रोकडे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, तहसिलदार (महसूल) शरद घाडगे, बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲड. सुचेता मलवाडे व समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोरोना साथीमध्ये ज्या बालकांनी पालक गमावले आहेत त्यांची माहिती तातडीने संकलित करावी. महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेने तर ग्रामीण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही माहिती संकलित करावी, असे आदेश चौधरी यांनी दिले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या मालमत्तेच्या हक्काबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. तसेच अशा बालकांचे जे नातेवाईक पालकत्व स्विकारणार आहेत किंवा दत्तक घेणार आहेत याबाबतही योग्य पध्दतीने कार्यवाही करावी, असे आदेश चौधरी यांनी दिले.

आई-वडील गमावलेली बालके तसेच एक पालक गमावलेली बालके अथवा बालकांचा सांभाळ करण्यासाठी असक्षम असलेल्या पालकांची सविस्तर माहिती असलेली यादी महिला बाल विकास विभागाने पोलीस प्रशासनाकडे सादर करावी. पोलीस प्रशासनाने या यादीनुसार संबंधितांशी संपर्क साधून अडीअडीचणी जाणून घेवून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश चौधरी यांनी दिले.कोरोनामुळे छत्र हरविलेल्या कुटुंबांची संबंधित यंत्रणांकडून माहिती घेवून या कुटुंबांमध्ये जर रेशन कार्ड नसेल तर प्राधान्याने रेशन कार्ड देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांना महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचीही माहिती तातडीने संकलित करावी, असे आदेश चौधरी यांनी दिले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनाथ आश्रमातील बालकांनाही कोरोनाचा उपचार घेण्याची वेळ आल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर व हॉस्पीटलमध्ये स्वतंत्र कक्ष करण्याची कार्यवाही आरोग्य विभागामार्फत व्हावी. त्याचबरोबर अनाथ आश्रमातील बालकांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यात यावे, असे आदेश चौधरी यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी