शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

हक्काच्या घरकुलासाठी लाभार्थ्यांची पायपीटच!

By admin | Updated: September 5, 2014 23:32 IST

कवठेमहांकाळमधील चित्र : जिल्हा परिषदेत प्रस्ताव धूळ खात

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ --कवठेमहांकाळ तालुक्यातील इंदिरा आवास घरकुल योजनेचे गरजू लाभार्थी व वसंत घरकुल योजनेचे गरजू लाभार्थी गेले सात महिने हक्काच्या निवाऱ्यासाठी शासनदरबारी पायपीट करीत आहेत. पण सांगली जिल्हा परिषदेत हे प्रस्ताव मंजुरीसाठी धूळ खात पडल्याने ऐन पावसाळ्यात हे गरजू लाभार्थी निवाऱ्यासाठी शासनाचे दरवाजे ठोठावत आहेत. २४४ गरजू इंदिरा आवासच्या निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. सद्यस्थितीला हा तालुका विकासाच्या मार्गावरून मार्गक्रमण करीत आहे. तरीही तालुक्यात दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांची संख्या हजाराच्या घरात आहे. ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आजही गरिबीचे व हलाखीचे जीवन जगत आहेत. बदलत्या कामानुसार या गोरगरिबांच्या जीवनमानात म्हणावासा बदल व आवश्यक अशी प्रगती झालेली दिसून येत नाही. आजही ही कुटुंबे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शिक्षण या मूलभूत गरजांसाठी झगडताना दिसून येत आहेत.या दारिद्र्य रेषेखालील लोकांना हक्काचा निवारा मिळावा, म्हणून शासनाच्यावतीने इंदिरा आवास घरकुल योजना कार्यरत आहे. परंतु या योजनेतून लाभ मिळविण्यासाठी गरजू लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. प्रस्ताव वेळेत देऊनही घरकुल वेळेत मंजूर न झाल्याने, घरकामासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची दरवाढ होऊन या लाभार्थींना दरवाढीचा फटका बसतो व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. निवडणुकीचा काळ जवळ आल्याने आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा आचारसंहिता जाहीर झाली की, परत लाभार्थींना तब्बल पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी तरी या लाभार्थींना हक्काच्या निवाऱ्याची मंजुरी जिल्हा परिषद देणार का? असा सवाल हे गोरगरीब करू लागले आहेत.