शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे वाटून निवडून येतोय! : सांगली नगरसेवकाचे धक्कादायक विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:03 IST

सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले.

ठळक मुद्देरस्त्याचे काम रोखल्याने संताप

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले. यावेळी नागरिकांनी नगरसेवक मनगू सरगर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करताच संतापलेल्या सरगर यांनी ‘पैसे वाटून निवडून येतोय, बोलायचं काम नाय’ असे सुनावल्याने उपस्थितांना धक्का बसला.

संजयनगरला अभिनंदन कॉलनीत तिसऱ्या गल्लीत रस्त्याचे काम सुरू आहे. सुमारे सात लाख रुपये खर्च करून बीबीएम रस्ता करण्यात येत होता. नागरिकांनी कारपेट रस्ता करावा, या मागणीसाठी रस्त्याचे काम बंद पाडून ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी ठेकेदार व नागरिकांत जोरदार वाद झाला. याची माहिती मिळताच नगरसेवक मनगू सरगरही तेथे आले. नागरिकांनी सरगर यांना याबाबत जाब विचारला. ‘

तुम्ही तीनवेळा नगरसेवक झाला, पण पंधरा वर्षात याठिकाणी कारपेट रस्ता का केला नाही? कारपेट रस्ताच करा, बीबीएम रस्ता नको’, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर सरगर व नागरिकांमध्ये वादावादी झाली. संतापलेल्या सरगर यांनी, ‘मी पैसे देऊन निवडून आलो आहे. बोलायचं काम नाही’, असे उत्तर दिले. त्यांच्या या अनपेक्षित उत्तरामुळे उपस्थितांना धक्का बसला. यानंतर ठेकेदार व तुम्ही बघून घ्या, असे म्हणत सरगर यांनी तेथून काढता पाय घेतला.

नागरिकांनी मात्र हा रस्ता कारपेट करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. याप्रश्नी आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. यावेळी शेरबानू बागवान, सुखदेव गडदे, रेश्मा मुल्ला, मोहन सरगर, संजय सरगर, रोहित केंगार, सुरेश जाधव, इम्रान शेख, भानुदास सरगर, दिलावर गवंडी, सलीम बागवान उपस्थित होते.सांगलीतील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीत बुधवारी महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या बीबीएम रस्त्याचे काम नागरिकांनी बंद पाडले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली