शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीकरांच्या पाण्याला मधमाशांचा अडथळा

By admin | Updated: December 15, 2015 00:45 IST

नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने : मोहोळ काढणाऱ्यांचा शोध; चाचणी रखडल्याने भटकंतीची वेळ

अविनाश बाड --- आटपाडी ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ या म्हणीप्रमाणे आटपाडीकरांच्या पाणीपुरवठा योजनेने अनेक अडथळे पार केल्यानंतर आता मधमाशांच्या मोहोळाचे विघ्न आले आहे. १६ कोटी खर्चाच्या, भारत निर्माण योजनेतून आटपाडीकरांसाठी केलेल्या या योजनेच्या पाण्याची चाचणी आता, सध्या जुन्या पाण्याच्या टाक्यांवर मधमाशांचे मोहोळ असल्याने थांबली आहे. ग्रामपंचायतीचे कारभारी, ‘कुणी मोहोळ काढता का मोहोळऽऽ?’ असे म्हणत मोहोळ काढणाऱ्यांच्या शोधात आहेत.आटपाडी गावाची वाढती लोकसंख्या आणि जुनाट झालेली पाणीपुरवठा योजना, यामुळे येथे पाणीटंचाई कायमचीच असते. त्यात आटपाडी तलावातून थेट सायफनने पाणी विहिरीत टाकून ते पाणी गावाला पुरविले जाते. भारत निर्माण योजनेतेतून जलशुध्दीकरण प्रकल्पासह नवी योजना झाल्याने गावाला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली. ही योजना थेट आटपाडी तलावातून पाणी आणून ते शुध्द करुन गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरवठा होणार आहे.या योजनेचे पाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या भवानी हायस्कूलच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या टाक्यांमध्ये सोडण्यात आले. हे पाणी जुन्या योजनेच्या तुलनेत कमी दाबाने पडत असल्याचे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कमी पाणी आल्याने टाक्या भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे गावाला वेळेत पाणी मिळत नाही.वास्तविक जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे २० अश्वशक्तीच्या दोन मोटारी आहेत. नव्या योजनेत ४० अश्वशक्तीच्या पंपाने तलावाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी सोडून ते सायफन पध्दतीने गावातील टाकीमध्ये सोडण्यात येत आहे. ‘सायफन’ने पाण्याचा दाब अधिक येणे अपेक्षित आहे. यावर प्रत्यक्षात टाकीवर दोन्हीही योजनांचे पाणी किती दाबाने पडते, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी अभियंत्यांना टाकीवर चढून पाहणी करावयाची आहे. पण भवानी हायस्कूलच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या २० वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांवर मधमाशांनी मोहोळ तयार करून पिंगा घातला आहे. प्रत्येक टाकीला तीन ते चार मोहोळ आहेत. काही जुनाट मोहोळांनी टाकीला जुनाट दाढीचे स्वरुप दिले आहे. त्यामुळे कुणीही टाकीवर जाणाचा प्रयत्न केल्यास त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना होऊनही आटपाडीकरांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. नव्या योजनेचे पाणी कमी वेगाने टाक्यांमध्ये पडत असल्याची पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी टाकीवर प्रत्यक्ष जाण्यासाठी मोहोळ काढणाऱ्या माहीतगारांचा शोध घेत आहोत.- स्वाती सागर, सरपंच, ग्रामपंचायत आटपाडीटाकीत प्रत्यक्ष पाणी किती दाबाने पडते हे पाहिल्यानंतर, आवश्यक ती तांत्रिक सुधारणा करता येणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना टाक्यांवरील मोहोळ काढण्यास सांगितले आहे. ते काढताच २-३ दिवसात पाणी पुरवठा सुरू करणे शक्य आहे.- ए. आर. आत्तार, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, विटा.पाणी हवे असेल तर : आधी लगीन मधमाशांचेआटपाडीला पिण्याचे शुध्द पाणी मिळायचे असेल, तर आधी पाण्याच्या टाक्यांवरील मधमाशांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी मधमाशांवर मात करणाऱ्या शूरांच्या शोधात गावाचे कारभारी आहेत. या पाण्याच्या टाक्यांवर गेल्या २० वर्षात कुणीही चढलेले नाही. त्यामुळे पायऱ्याही निकामी झाल्या आहेत. गेल्या २० वर्षात या गावाला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्याही कधी धुतलेल्या नाहीत. नागरिकांची तरीही अस्वच्छ पाण्याबद्दल तक्रार नाही. कसले का असेना, पाणी मिळावे, एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.