शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

जागावाटप फॉर्म्युला ठरला!

By admin | Updated: April 24, 2015 01:16 IST

जिल्हा बँक निवडणूक : राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, भाजप ३, शिवसेना १, सर्वपक्षीय सहमतीची शक्यता

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय एकमत होण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादीला नऊ, काँग्रेसला आठ, भाजपला तीन आणि शिवसेनेला एक जागा देण्याचा ‘फॉर्म्युला’ जवळपास निश्चित मानला जात आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. भाजप पाच जागांवर, तर काँग्रेस नऊ जागांसाठी अडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. गुरुवारी माजी मंत्री मदन पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील दिवसभर विश्रामबाग परिसरातील हॉटेलमध्ये ठाण मांडून होते. मिरजेच्या महाबळ फार्म हाऊसवरून माजी मंत्री आमदार जयंत पाटील सूत्रे हलवत होते. भाजपने पाच जागांसाठी, तर काँग्रेसने नऊ जागांसाठी आग्रह धरला होता. चर्चेच्या फेऱ्या रात्री उशिरापर्यंत चालल्या. खासदार पाटील यांनी पाच जागांचा आग्रह धरल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. मिरजेच्या फार्म हाऊसवर दीड तास याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विश्रामबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी सात वाजता संजय पाटील, मोहनराव कदम आणि विलासराव शिंदे यांची बैठक झाली. काँग्रेसला मिळणाऱ्या जागांबाबत पक्षांतर्गत मतभेद दिसून आले. काही नेत्यांनी आठ जागांवर सहमती दर्शवावी, असे सुचविले. तर काहींनी नऊ जागा मिळाल्या नाहीत, तर स्वतंत्र पॅनेलची तयारी करण्याचे मत व्यक्त केले. बहुतांश नेत्यांनी आठ जागांबाबत हिरवा कंदील दर्शविल्याचे समजते. काँग्रेसने शेवटपर्यंत भाजप किंवा शिवसेनेसाठी एकही जागा न देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला भाजपच्या नेत्यांची मनधरणी करावी लागली. भाजपमुळेच रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याप्रमाणे निश्चित होण्याची शक्यता नेत्यांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)