शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ व्हाल!

By admin | Updated: August 13, 2015 23:17 IST

मदनभाऊंचा दम : काँग्रेसअंतर्गत वादावर नगरसेवकांच्या बैठकीत खरडपट्टी

सांगली : महापालिकेतील काँग्रेसअंतर्गत वादावर सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली. पदाधिकारी, नगरसेवकांना डोस देताना ‘नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ म्हणून पाटी लावायला तयार राहा’, असा दमही गद्दारी करण्याचे मनसुबे आखलेल्यांना भरला. केवळ आपलीच कामे प्रशासनाकडे न रेटता सर्वसामान्य नगरसेवकांची कामे करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. बुधवारी रात्री मदन पाटील यांच्या फार्म हाऊसवर नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पाटीलसमर्थक ३० नगरसेवक उपस्थित होते, तर पतंगराव कदम गटाचे दहाजण गैरहजर होते. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये पाटील-कदम गटात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी समर्थकांची कानउघाडणी केली. कोणाची पावले वेडीवाकडे पडणार असतील, तर त्यांनी आतापासूनच माजी नगरसेवक व्हायला तयार व्हावे. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पाटील यांनी सुनावले. काही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बैठकीत तक्रारी केल्या. पदाधिकारी केवळ आपल्या प्रभागातील कामे प्रशासनाकडे रेटतात. प्रशासनही त्यांचेच ऐकते. त्यामुळे सामान्य नगरसेवकांना न्याय मिळत नाही, असा नगरसेवकांचा सूर होता. पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना त्यांनी पालिकेत पन्नास टक्के महिला नगरसेविका आहेत, त्यांची कामे होताना अडचणी येतात. या कामाचा पाठपुरावा पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून करावा. नव्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करण्याची सूचना केली. ‘मला पालिकेतील सत्तेची चिंता नाही. मी कोणाशीही तडजोड करू शकतो,’ असे सूचक वक्तव्य करीत मदनभाऊंनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी जुळलेला राजकीय संबंध उघड करीत एकप्रकारे कारभाऱ्यांना इशाराच दिला. राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेला निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मुंबईत पाठपुरावा करण्याची गरज आहे. सध्याचे पदाधिकारी सहा महिने खुर्चीवर बसून आहेत; पण एकदाही मंत्रालयात गेलेले नाहीत. भाजप सरकारमधील काही मंत्र्यांशी आपली चांगली ओळख आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. त्यासाठी शासन, नगरविकास खात्याकडे प्रयत्न करावेत. खुर्चीला चिकटून बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा खासगीकरणावर चर्चापाणीपुरवठा विभागातील वसुली व इतर कामे खासगी एजन्सीकडे देण्यावरही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला, तर ज्यांनी हा ठराव आणला आहे, त्यांनी त्याचे समर्थनही केले. त्यावर मदन पाटील यांनी गटनेते किशोर जामदार यांना, काय विषय आहे, असे विचारले. जामदार यांनी या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, येत्या दोन दिवसांत अभ्यास करून पार्टी मिटिंगमध्ये सर्व सदस्यांना त्याची कल्पना देऊ, त्यानंतरच सर्वसंमतीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. जनाबांची उपस्थितीमदन पाटील यांच्या बैठकीवर इद्रिस नायकवडी गटाने बहिष्कार टाकला होता; पण त्यांचे वडील इलियास नायकवडी मात्र फार्म हाऊसवर उपस्थित होते. त्यांनी मदनभाऊंशी खासगीत चर्चा केली आणि ते बैठकीतून निघून गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचाविल्या होत्या. नायकवडी गटाची नेमकी भूमिका काय? अशी चर्चा आज दिवसभर महापालिकेत सुरू होती. गतवेळेसारखा बीओटीचा घोळ नकोबैठकीत बीओटीच्या संभाव्य प्रस्तावावरही चर्चा झाली. मदन पाटील यांनी मागील बीओटीसारखे प्रकार करू नका, अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेचे उत्पन्न घटले असून, नवे पर्याय शोधावे लागतील. त्यासाठी बीओटी हा एक पर्याय असू शकतो. पण गतवेळेसारखे भूखंड विकून बीओटी नको आहे. कायदेशीर आणि महापालिकेचा जास्तीत जास्त फायदा करून देणारे बीओटी प्रकल्प करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.