शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या रणांगणात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचाच उतावळेपणा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 18:55 IST

परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्यारुपाने तिसरा गट सक्रिय झाला आहे. अविनाश मोहिते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांना स्वबळावरच निवडणुकीत उतरावे लागणार आहे.

ठळक मुद्दे पारंपरिक लढती रंगणार । यंदाही प्रमुख तीन गटातच चुरशीने होणार निवडणूक

अशोक पाटील ।इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच उतावळे झाल्याचे चित्र आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या प्रमुख तीन गटांमध्येच ही निवडणूक रंगणार आहे.

या निवडणुकीत पारंपरिक मोहिते-भोसले या दोन गटातच लढत होत आली आहे. परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्यारुपाने तिसरा गट सक्रिय झाला आहे. अविनाश मोहिते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांना स्वबळावरच निवडणुकीत उतरावे लागणार आहे. त्यातच मदनराव मोहिते यांनी भोसले गटाशी संधान साधल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हेही महत्त्वाचे आहे.

अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या मोठी आहे. त्यामुळे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संधान साधून संपर्क वाढवला आहे, तर अविनाश मोहिते यापूर्वीच राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांचे पतंगराव कदम यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने मंत्री विश्वजित कदम यांना इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी राहतील, असे चित्र आहे.

 

आपण कराड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात दौरे सुरु केले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून संस्था घशात घालणाऱ्यांविरोधात माझा लढा आहे. त्यामुळे आपण कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे पॅनेल लढवणार आहोत.- अविनाश मोहिते,माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना.हंगाम पार पडल्यानंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला गती येईल. आमचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते आहेत. सध्या मदन मोहिते डॉ. भोसले यांच्या गोटात आहेत. या दोघांच्या निर्णयाची वाट पाहून कोणाला मदत करायची ते ठरवू.- आनंदराव मलगुंडे,माजी संचालक, कृष्णा कारखाना.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली