शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज अंडी पुरवतोय बँक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 17:30 IST

CoronaVirus Sangli Hospital : कासेगाव (ता.वाळवा) येथील व्यावसायिक आणि बँक अधिकारी शिराळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज शंभर अंडी पुरवत आहे. अशोक माने हे त्यांचे नाव. ते जिल्हा बँकेत तालुका विभागीय अधिकारी असून, मागील महिन्यापासून रुग्णांना शंभर अंडी शिजवून देत आहेत.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज अंडी पुरवतोय बँक अधिकारी शिराळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात मदत

विकास शहा शिराळा : कासेगाव (ता.वाळवा) येथील व्यावसायिक आणि बँक अधिकारी शिराळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज शंभर अंडी पुरवत आहे. अशोक माने हे त्यांचे नाव. ते जिल्हा बँकेत तालुका विभागीय अधिकारी असून, मागील महिन्यापासून रुग्णांना शंभर अंडी शिजवून देत आहेत.पैसे असूनही आईला कोरोनामधून वाचवू शकलो नाही. तसे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आईच्या स्मरणार्थ माने यांनी हे कार्य सुरू केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आनंदा कांबळे रोज सकाळी नऊ वाजता न चुकता शिजवलेली अंडी रुग्णांना देतात. नातेवाइकांनी कांबळे यांच्याकडे अंडी कोण देते, याची विचारणा केली असता, त्यांनी अंडी देणाऱ्याचे नाव माहीत नसल्याचे सांगितले. यामुळे त्या अवलियाच्या शोधात रुग्णांचे नातेवाईक होते.जाहिरातबाजी न करता हे सत्कार्य सुरू आहे. त्या दात्याचा शोध घेतला असता, ते कासेगाव येथील व्यावसायिक व शिराळा येथील जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी अशोक माने असल्याचे समजले.कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सातारा येथील रुग्णालयात माने यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पैसा असूनही आईला वाचविता आले नाही, हे दुःख जिव्हारी लागल्याने आईच्या स्मरणार्थ ते रोज शिराळा येथे बँकेत कामावर येताना घरातून अंडी शिजवून आणतात.

कोरोनाचे संकट असेल, तोपर्यंत रोज अंडी पुरवणार असल्याचे त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. त्यांनी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना भाजीपाला दिला होता. रुग्णांना ते आर्थिक स्वरूपातही मदत देत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्नSangliसांगली