शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष समितीची मलमपट्टी; ठेकेदारावर केली उधळपट्टी तासगावात कागदोपत्री कारभार : सहा महिन्यात अटी-शर्ती नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:12 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेचा ठेका देताना, विशेष ठराव घेण्यात आला. त्यानुसार समितीकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी अटी आणि शर्ती ठरवून,

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेचा ठेका देताना, विशेष ठराव घेण्यात आला. त्यानुसार समितीकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी अटी आणि शर्ती ठरवून, ठेकेदाराच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली. मात्र अद्याप अटी आणि शर्तीच ठरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काम झाले नसतानादेखील, ठेक्यानुसार बिल देण्यातआले. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांची ठेकेदारावर मेहरनजर असल्यामुळे विशेष समितीच्या मलमपट्टीने उधळपट्टी झाली आहे.

पारदर्शक कारभाराची ग्वाही देत पालिकेत भाजपचे कारभारी सत्तेत आले. सत्ताधाºयांचा कारभार सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच स्वच्छतेच्या ठेक्यात बदल झाला. २००७ पासून असलेला बीव्हीजीकडील स्वच्छतेचा ठेका काढून घेण्यात आला. त्याऐवजी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला तो देण्यात आला. सर्वात कमी दराची निविदा हीच होती. सत्ताधाºयांनी २० जूनरोजी ठेक्याबाबत अटी आणि शर्ती ठरवण्यासाठी विशेष समिती नेमली. तिच्याकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी कामाबाबतच्या अटी आणि शर्ती ठरवून देण्याचा निर्णय झाला. यानुसार समितीने दिलेल्या अटी आणि शर्तीनुसारकाम करणे अपेक्षित होते.

या ठरावानुसार ठेकेदाराकडून करारपत्र करुन वर्कआॅर्डर देण्याचाही निर्णय झाला होता. मात्र ठेका देऊन सात महिने होत आले, तरीदेखील अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या नाहीत. समितीतील सदस्यांनी देखरेख करुन वेळोवेळी पालिकेला न झालेल्या कामाबद्दल सूचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र सूचना तर दूरच, अटी आणि शर्तीच सादर केल्या नसल्याचे उघड झाले आहे.दरम्यान, ठेकेदाराने १ जुलैपासून शहरातील स्वच्छतेचे काम सुरू केले. तेव्हापासून त्याच्या मर्जीनुसारच काम सुरू आहे. त्याच्यावर विशेष मर्जी असणाºया एका नगरसेवकाच्या वरदहस्तामुळे, समिती नामधारी राहिली. न केलेल्या कामाचे बिल देण्यात आले.३४ लाखांचा चुराडा१ जुलैपासून पाच महिन्यांचे बिल ठेकेदाराला देण्यात आले आहे. ठेक्यातील तदतुदीनुसार दहा टक्के रकमेची कपात पालिकेकडून करणे अपेक्षित होते. मात्र समितीकडून अटी आणि शर्ती मिळाल्या नसल्याने प्रशासनाकडून ठेक्याच्या १८ टक्के रक्कम अनामत म्हणून कापून घेण्यात आली होती. ठेकेदाराला आतापर्यंत पाच महिन्यांच्या बिलापोटी ३४ लाख ४८ हजार ९५५ रुपयांचे बिल देण्यात आले आहे.अशी आहे विशेष समिती...नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूनम सूर्यवंशी, तत्कालीन स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती मंगल मानकर, नगरसेवक दत्तात्रय रेंदाळकर आणि नगरसेवक अ‍ॅड. सचिन गुजर.