शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी

By admin | Updated: December 21, 2015 00:51 IST

अजित सूर्यवंशी : पुन्हा राज्यभरात आंदोलन उभारणार; पान दुकानदारांचा मेळावा

सांगली : सुगंधित तंबाखू विक्री करण्यावर राज्य शासनाने घातलेली बंदी तातडीने उठवावी, अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला. रविवारी पटेल चौकातील साने गुरुजी उद्यानमध्ये महापालिका क्षेत्रातील पान दुकानदारांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, १८ जुलै २०१३ पासून शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पान व्यवसाय अडचणीत आला आहे. पान दुकानदारांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा हा डाव आहे. राज्यातील ५० लाख पान दुकानदार व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाला सुगंधित तंबाखूवर बंदी आणायची असेल, तर जिथे या तंबाखूचे उत्पादन होते, तिथे बंदी आणावी. कायद्याचा आधार घेऊन अन्न, औषध प्रशासन व पोलीस विनाकारण पान दुकानदार व फेरीवाल्यांना त्रास देत असतील, तर आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी प्रथम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, त्यानंतर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी. जिल्हा पान असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, शासनाच्या गुटखा बंदीला पान दुकानदारांनी पाठिंबा दिला. पण आता सुगंधित तंबाखूवर घालण्यात आलेली बंदी ही अन्यायकारक आहे. शासन बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण पान व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. देशात आणि राज्यात दारु व सिगारेटमुळे लाखो लोकांचा बळी जात आहे. पण त्यावर बंदी घालण्यासाठी शासन पुढाकार घेत नाही. सुगंधित तंबाखूवर बंदी घालून, राज्यातील लाखो पान दुकानदार व फेरीवाल्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, शहर अध्यक्ष मयूर बांगर यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिनदार राजू पागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसूफ जमादार, कार्याध्यक्ष बाबू कारंडे, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, प्रकाश मोरे, रफीक मुजावर, अफजल चाऊस, रावसाहेब सरगर, राजू फोंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात प्रथम उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद, बोंबाबोंब, भीक मांगो व मोर्चा अशी टप्प्या-टप्प्याने आंदोलने केली जातील. यातूनही शासनाने तंबाखूवरील बंदी उठवली नाही, तर राज्य पातळीवर व्यापक आंदोलन उभे केले जाईल.