शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत बालगंधर्व नाट्यगृह अखेर सुरु

By admin | Updated: July 7, 2015 23:33 IST

नाट्यप्रेमींच्या आंदोलनास यश : तहसीलदारांकडून महापालिकेस परवाना

मिरज : तांत्रिक अडचणीमुळे गेले चार महिने बंद असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहास तहसीलदारांनी परवाना दिल्याने नाट्यगृह सर्वांसाठी खुले झाले आहे. परवाना मिळाल्यानंतर नाट्यकलाकार व रसिकांनी महाराणा प्रताप चौकात फटाके उडवून जल्लोष केला. तसेच बालगंधर्व नाट्यगृहात नटसम्राट बालगंधर्व यांच्या प्रतिमेचे पूजन केले. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहास पूर्णत्वाचा दाखला, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, विद्युत पुरवठा तपासणी दाखला नसल्याने बालगंधर्व नाट्यगृहास परवाना मिळाला नव्हता. त्यामुळे गेले सहा महिने नाट्यगृह बंद होते. नाट्यगृह सुरू व्हावे यासाठी नाट्यकलाकार व रसिकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने नाट्यगृह दाखल्यासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण केले. आ. सुरेश खाडे यांनी आज तहसील किशोर घाडगे, महापालिका उपायुक्त सुनील नाईक, रमेश वाघमारे, अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ यांच्यासोबत बैठक घेतली. सप्तरंगी सहयोगी कला मंचचे अध्यक्ष ओंकार शुक्ल, प्रशांत गोखले, दिगंबर कुलकर्णी, विनायक इंगळे, धीरज पलसे यांसह कलाकार बैठकीस उपस्थित होते. त्रुटींची पूर्तता करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी महापालिकेस नाट्यगृह परवाना दिला. यामुळे बंद नाट्यगृह पुन्हा सुरू होणार आहे. बंद नाट्यगृह सुरु करण्यासाठीच्या आंदोलनाला यश मिळाल्याने ओंकार शुक्ल, सचिन चौगुले, प्रशांत गोखले, धीरज पलसे, वैशाली गोडबोले, ऋषिकेश कुलकर्णी, विनायक इंगळे, दिगंबर कुलकर्णी, प्रतीक धुळूबुळू, प्रशांत बेळंकी, अमोल कांबळे, हेमंत वायदंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रीकांत चौकात फटाके वाजवून जल्लोष केला. ‘बालगंधर्व’मधील पहिला प्रयोग म्हणून दि. १२ रोजी ‘छु मंतर’ हा वसंत कानेटकर लिखित प्रयोग सादर करण्यात येणार आहे. बुधवार दि. १५ रोजी बालगंधर्व पुण्यतिथीनिमित्त ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम, नाट्यगीते, नृत्य, भक्तिगीत, भावगीत सादरीकरण व बालगंधर्व प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. बालगंधर्वांच्या प्रतिमेचे पूजन नाट्यकला उपासक ऋषिकेश बोडस, शरद जाधव व नाट्य परिषद मिरज शाखेचे अध्यक्ष हनुमंत गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने ‘सरकारी थिएटर ते बालगंधर्व नाट्यगृह एक प्रवास’ या विषयावर मानसिंग कुमठेकर यांचे व्याख्यान व मिरजेचा इतिहास सांगणाऱ्या वस्तूंचे व ग्रंथ प्रदर्शन होणार आहे. विजय कुलकर्णी, शरद बापट, रवींद्र फलटणकर, नीलेश जोशी, भालचंद्र काशीकर, स्मिता महाबळ, विजय गोखले, मेधा सोहनी, ऋषिकेश चौगुले, पवन कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, राजू सुपेकर यात सहभागी होणार आहेत. धनंजय जोशी, राजेंद्र नातू, संजय रूपलग, तानाजी कागवाडे, ऋषिकेश देसाई, मारुती गायकवाड, डॉ. विनिता करमरकर, सुबोध गोरे, बाळासाहेब मिरजकर, सुधीर गोखले, विकास कुलकर्णी, श्रेयस गाडगीळ यांनी संयोजन केले आहे.