शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

‘बॅगलिफ्टिंग’चे खापर विश्रामबागच्या ‘डीबी’वर!

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

बरखास्तीचा दणका : पोलीस दलात खळबळ

सचिन लाड - सांगली -गेल्या वर्षभरात शहरात बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटणाऱ्या (बॅगलिफ्टिंग) गुन्ह्यांचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना अपयश आल्याचा ठपका ठेवत गुन्हे प्रगटीकरण शाखा (डीबी) सोमवारी रात्री बरखास्त केली. सांगली व मिरजेतील पोलीस ठाण्यांतील डीबीपेक्षा विश्रामबागच्या ‘डीबी’ची गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी राहिली आहे. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांचे कौतुक केले होते.गेल्या वर्षभरात विश्रामबागच्या डीबीची कामगिरी चांगली राहिली आहे. बॅगलिफ्टिंगच्या गुन्ह्यांत तीन महिन्यांपूर्वी उस्मानाबाद येथील टोळीस अटक केली होती. हे गुन्हे होऊ नयेत म्हणून डीबी पथक गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील विविध बॅकांत ‘वॉच’ ठेवून आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. परंतु चोरटे सातत्याने ठिकाण व गुन्ह्याची पद्धत बदलून हात मारत आहेत. चोरट्यांना पकडणे आव्हानात्मक आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सक्षम असणारा पोलीस दलातील महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग गेल्या तीन-चार महिन्यांत कोमात गेला असल्याचे चित्र आहे. घरफोडींचा छडा व फरारी गुन्हेगार पकडण्याशिवाय त्यांची कोणतीही कामगिरी दिसत नाही. अनेकदा विश्रामबागची ‘डीबी मागावर’ असलेले गुन्हेगार एलसीबीने पकडले. बॅगलिफ्टिंगच्या शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा एलसीबीकडून छडा लागेल, अशी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. गेल्या चार महिन्यांत विश्रामबाग हद्दीत केवळ दोन गुन्हे घडले आहेत. नूतन पोलीसप्रमुख फुलारी यांचे आगमन झाल्यानंतर एक गुन्हा घडला. हाच गुन्हा डीबीने आतापर्यंत केलेल्या कामावर पाणी फिरवून गेला. सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून दोन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या महिलेस याच डीबीने पकडले होते. सातत्याने डीबीची काही ना काही कामगिरी असताना, डीबीची शाखा बरखास्तीचा तडकाफडकी निर्णय झाल्याने याची मंगळवारी दिवसभर चर्चा होती. या शाखेतील अधिकारी व पोलीस कर्मचारी मंगळवारी गणवेशात ड्युटीवर आले होते.