शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड यात्रा :बावधनला बगाड पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:23 IST

‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली.

ठळक मुद्दे‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष

बावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला.

बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्या परमेश्वर माने यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.

यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान परमेश्वर ऊर्फ दिलीप माने (वय ५२) यांना मिळाला. एका वेळी दहा-बारा बैल जोड्यांच्या मदतीने हा रथ ओढण्यात येत होता. ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी पंधराशे बैल शिवारातून उभे दिसत होते.

बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे नियोजन समिती नेमली होती. या समितीतील सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते.

भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र्राचे पथक तैनात करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास बगाड, वाई-बावधन रस्त्यावर आले. यावेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर आईस्क्रीम व शीतपेयाच्या हातगाड्या उभ्या होत्या. वाई-सातारा रस्त्यावर दुतर्फा हॉटेल व मिठाई व्यावसायिक, खेळणीवाले, शीतपेयांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.कडेकोट पोलीस बंदोबस्तयात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह पन्नास पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाची तुकडी, महिला व वाहतूक पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. बगाड मिरवणूक शांततेत पार पडली.सातारा जिल्ह्यातील बावधन येथील ग्रामदैवताची सोमवारी यात्रा होती. यानिमित्ताने बगाडाची मिरवणूक आयोजित केली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दाखल झाले होते.