शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खराब टायरींनी वाढविले शहराचे सौंदर्य, सांगली स्वच्छ करायचा युवकांनी घेतला वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:51 IST

गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.

ठळक मुद्देखराब टायरींनी वाढविले शहराचे सौंदर्यसांगलीनगरी स्वच्छ करायचा युवकांनी घेतला वसा

सांगली : गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.सांगलीत स्वच्छतेसाठी खूळ लागलेल्या काही तरुण पोरांनी एकत्र येऊन सांगलीनगरी स्वच्छ करायचा वसा घेतला आहे. राकेश दड्डण्णावर याने यात पुढाकार घेतला आहे. आज त्याच्याच धडपडीने सांगलीचे काही कोपरे, काही भाग माणसात आले आहेत. या युवकांनी एकत्र येऊन निर्धार संघटना या ग्रुपच्या माध्यमातून १ मे २०१८ महाराष्ट्र दिनापासून स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, कचरामुक्त सांगली या संकल्पनेचा निर्धार केला. स्वच्छता यात्रा सांगली हे अभियान प्रभागानुसार सुरू केले.

नागरिकांना आवाहन केलं, पण त्यांची वाट बघण्यात वेळ घालवला नाही. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता राकेश दड्डणावर आणि त्यांचे सहकारी सांगली शहरात दररोज एका ठिकाणी एखादा परिसर साफसफाई करताना दिसतात. त्यांचं हे स्वच्छता अभियान आता स्वच्छतेतून सुंदरतेकडे निघाले आहे.

राकेशचा ग्रुप आता सांगलीत स्वच्छ केलेले पॉईंट सुशोभित करण्याची मोहीम राबवतो आहे. त्यासाठी त्यांना हवे आहेत खराब झालेले टायर, झाडाचे बुंधे, रंग, ट्री गार्ड..आजपर्यंत त्यांच्याकडे ४० टायर जमा झालेत. ते रंगवायचं कामही जोरात सुरु आहे. या टायरमध्ये झाडी लावण्यात येणार आहेत. नारळाच्या झाडाचे बुंधेही रंगवायचे सुरु आहे. बऱ्याच प्लास्टिक बाटल्या पण सुशोभीकरणाच्या कमी येत आहेत. आम्हाला कचरा, भंगार द्या..आम्ही तोही सुंदर करू असं राकेश सांगत आहे

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली