फोटो ०५ संजय निटवे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबूराव जाधव (तासगाव) तर कार्याध्यक्षपदी डॉ. संजय निटवे (सांगली) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी इब्राहीम नदाफ (जत) आणि चंद्रकांत वंजाळे (नांद्रे) तर सचिवपदी प्रा. वासुदेव गुरव (तासगाव), नामदेव पिसे (आटपाडी) यांच्या निवडी झाल्या.
समितीच्या ऑनलाइन बैठकीत या निवडी झाल्या. अन्य निवडी अशा : रवी सांगोलकर, जत (युवा विभाग), प्रकाश शिंदे, मायणी (वार्तापत्र विभाग) सुनील भिंगे, आटपाडी (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प), संजय गलगले, सांगली (बुवाबाजी संघर्ष विभाग), त्रिशला शहा, मिरज (सांस्कृतिक विभाग) धनश्री साळुंखे, सांगली (महिला विभाग), कैलास सुतार, विटा (मानसिक आरोग्य विभाग), प्रवीण कोकरे, कुपवाड (विविध उपक्रम विभाग), ॲड. सुनील महामुनी, तासगाव (कायदा विभाग), संतोष गेजगे, जाडरबोबलाद (जातीअंत विभाग), माणिक कांबळे, विटा (सोशल मीडिया विभाग). सल्लागार समितीमध्ये डॉ. अमोल पवार, पलूस, सुभाष पाटील, हणमंतवडीये, व्ही. वाय. पाटील, नागराळे, आर. एस. कुलकर्णी, आटपाडी, मारूती शिरतोडे, वाझर, महेश जोतराव, सांगली, डॉ. सतीश पवार, तासगाव यांचा समावेश झाला.
राज्य समितीसाठी प. रा. आर्डे, राहुल थोरात, सांगली, फारूक गवंडी, तासगाव, वाघेश साळुंखे, विटा, शशिकांत सुतार, सांगली यांची नियुक्ती झाली.
प्रा. आर्डे, स. नि. पाटील, आर. एस. कुलकर्णी यांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले.