शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू :  बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:15 IST

राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

ठळक मुद्देसांगलीत हमाल, माथाडी कामगारांचा मेळावाजेल भरो आंदोलनाचा आढाव यांचा इशाराबीड येथे २५ व २६ नोव्हेंबर रोजी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन

सांगली : राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले.

सांगलीत हमाल, मापाडी, हळद महिला कामगारांचा मेळावा व ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांना गाडी प्रदान समारंभ असा संयुक्त कार्यक्रम झाला, यावेळी डॉ. आढाव बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ, माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ उपस्थित होते.

आढाव म्हणाले की, आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, पण कष्टकºयांना पेन्शन नाही. हमालांना पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. आता केवळ हमालांपुरतीच लढाई हाती घेतली जाणार नाही, तर या लढ्यात शेतकरी, शेतमजुरांनाही सहभागी करून रस्त्यावरची लढाई हाती घेतली जाईल. त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. राज्यातील सर्व तुरूंग कष्टकºयांनी भरले पाहिजेत. मग पेन्शनची मागणी धुडकाविण्याची हिम्मत राज्यकर्त्यांना होणार नाही.

हमाल पंचायतीने अनेक वर्षे लढा देऊन बºयाच मागण्या मान्य करून घेतल्या. पण आता त्याच्या मुळावरच सरकार उठले आहे. जातपात, धर्म, स्त्री, पुरूष असे भेद विसरून तुम्ही एकत्र येऊन न्याय मिळविला आहे. तसाच लढा शेतकºयांनीही उभारला आहे. त्यांना केवळ कर्जमुक्ती देऊन चालणार नाही, तर शेतीमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाने स्वीकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पतंगराव कदम म्हणाले की, सांगली बाजार समितीत हमाल, व्यापारी, संचालक मंडळात कुठलाही तंटा नाही. त्यामुळे राज्यात सांगली बाजार समितीने पहिला क्रमांक मिळविला आहे. हमालांची पेन्शनची मागणी रास्त आहे. शेतकºयांसोबत हमालांनाही पेन्शन मिळाली पाहिजे. सरकारला धडा शिकविल्याशिवाय ते हलत नाही. त्यामुळे हा प्रश्न धसास लावण्यासाठी सर्वांनी एकत्र पुढाकार घेऊया.

बापूसाहेब मगदूम म्हणाले की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून कष्टकºयांच्या लढ्यात सहभागी झालो. कष्टकºयांना पेन्शन मिळाल्याशिवाय थांबणार नाही. डिसेंबरमध्ये शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी यांची एकत्रित परिषद घेणार आहोत. राजकुमार घायाळ म्हणाले की, कष्टकºयांनी लढा देऊन जे मिळविले, ते काढून घेण्याचे शासनाचे धोरण आहे.

गोवा, राजस्थान, दिल्लीत हमालांना पेन्शन दिली जाते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत शेजाळ, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांचीही भाषणे झाली.

हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, गोविंद सावत, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, श्रीमंत बंडगर, शालन मोकाशी, बजरंग खुटाळे, वसंत यमगर, बाबासाहेब गडदे उपस्थित होते.लोकांचे नव्हे, धर्माचे राज्यडॉ. बाबा आढाव यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही लढा दिला. आता तोच झेंडा, समाजवाद काढून टाकण्याची भाषा केली जात आहे. लाल झेंडा गेला, तर कष्टकºयांचे काहीच चालणार नाही. सध्या देशात उलटे वारे वाहू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर घाव घातला जात आहे. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जात, धर्म आडवे येत आहेत. लोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली.

बीडला अधिवेशनराज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे होत आहे. या अधिवेशनाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.