शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

तलाठ्याच्या अंगावर वाळूची वाहने घालण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 10, 2014 02:11 IST

हिंंगणगादेतील प्रकार : वाळू तस्कराचे कृत्य

विटा : येरळा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या तस्कराने महसूल विभागाच्या पथकातील गावकामगार तलाठींच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर व जेसीबी यंत्र अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे घडली. याप्रकरणी नेर्ली (ता. कडेगाव) येथील अजित भाऊसाहेब मुळीक या वाळू तस्कराविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने तीन ब्रास वाळूसह डंपर व जेसीबी यंत्र असा सुमारे २३ लाख ६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. हिंगणगादे येथील येरळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या वाळू तस्करी प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर हिंगणगादेचे गावकामगार तलाठी एस. एस. सुर्वे, एस. व्ही. पाटोळे, एस. ए. कोकणे, एस. एस. महाजन, कोतवाल शामराव कदम यांच्या पथकाने सोमवारी दुपारी याठिकाणी छापा टाकला. यावेळी क्रमांक नसलेल्या जेसीबीने तीन ब्रास वाळू डंपरमध्ये भरल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. छापा पडल्याचे लक्षात येताच अजित मुळीक याने पथकातील तलाठी व कोतवाल यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. पथकाने प्रसंगावधान राखून धाव घेतल्याने अनर्थ टळला. मुळीक व जेसीबीचा चालक वाहने सोडून फरार झाले. पथकाने वाळूचा पंचनामा करून २३ लाख ६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेनंतर आज, सोमवारी रात्री उशिरा मुळीक याच्याविरूद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपास हवालदार बी. डी. गावडे करीत आहेत. (वार्ताहर)