शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

By संतोष भिसे | Updated: April 5, 2024 15:56 IST

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ...

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा महार वतन बचाव संघर्ष समिती व हिंदू एकता आंदोलन संघटनेने दिला.हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश दुधगावकर, नितीन गोंधळे, सिद्धार्थ कुदळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, शुभम गोंधळे आदींनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, पत्रकारनगर, मुजावर प्लॉट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता,  कत्तलखाना  परिसर, गणेशनगर, गारपीर या टप्प्यात सुमारे ३५ एकर महार वतन जमीन आहे. त्यावर मालकी असणाऱ्या आंबेडकरी समाजाला दमदाटी करुन व फसवून काही लोकांनी हाकलून लावले. जमीन कसण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर हळूहळू अतिक्रमणे केली. काही ठिकाणी पक्की बांधकामे केली आहेत, तर काही ठिकाणी पत्र्याची शेड मारुन जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाला विस्थापित व्हावे लागले आहे. विचारणा करण्यास गेले असता धाक दाखविला जातो. दमबाजी केली जाते. प्रसंगी नशेखोरांना अंगावर सोडले जाते. शिंदे यांनी सांगितले की, या परिसरात सध्या अवैध धंदे बोकाळले आहेत. बेकायदा दारुविक्री, गॅसची तस्करी, मटक्याचे अड्डे फोफावले आहेत. गुंडगिरी वाढली आहे. त्यामुळे गरीब मागासवर्गीयांना जगणे मुश्किल झाले आहे. या जमिनी १० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे बळकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूळ उताऱ्यावर आंबेडकरी समाजाचीच नावे आहेत. तेथील अतिक्रमणे जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिसांनी तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू.यावेळी रोहन गोंधळे, राजेंद्र गोंधळे, प्रथमेश लोखंडे, राजेश कांबळे, आकाश गोंधळे, जगदीश कुदळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाVotingमतदान