शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2023 15:43 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले

सांगली : राज्यातील एसटी महामंडळ खासगी शिवशाही बसेसमुळे तोट्यात गेले असताना राज्य सरकार १८९५० खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एसटीच्या ४० हजार एकर जागांवर गृहविभागाचा डोळा असून त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.शिंदे, ताटे म्हणाले की, शिवशाही बसेसमुळे लालपरी आर्थिक संकटात आली असतानाही त्याकडे राज्य शासनाने गांभीऱ्याने लक्ष दिले नाही. या प्रश्नांवर गांभीऱ्याने विचार करण्याऐवजी राज्य शासनाने पुन्हा १८ हजार ९५० खासगी बसेस चालक व वाहकांसह एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापैकी पहिल्या वर्षी ९५०, दुसऱ्या वर्षी २५००, तिसऱ्या वर्षी ३५००, चौथ्या वर्षी ५००० आणि पाचव्या वर्षी ७००० असे एकूण १८९५० बसेस राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लालपरीचे अस्तित्वच संपणार आहे. एसटीचे खासगीकरण करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांबरोबर जनतेनही आवाज उठविण्याची गरज आहे. एसटी बसेसचे खासगीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला एसटीच्या मोकळ्या जागांवर सरकारचा डोळा आहे. एसटीच्या मोकळ्या जागा आमचा दागिना आहे. पूर्वीपासून या जागा सांभाळण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बसस्थानक उभारले त्याच ठिकाणी शहर, गावे वसली आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल, एलआयसीबद्दल जे झाले ते एसटीबद्दल घडू नये; अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू कराराज्य शासनाने काही महामंडळ व काही संस्थांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेले आहे, हे अन्यायकारक आहे. म्हणून दि. १ एप्रिल २०१६ पासून एसटी कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षांची मुदत मान्य करण्यास तयार आहे, असेही शिंदे व ताटे म्हणाले.

सदावर्ते यांच्यामुळे एसटी तोट्यातॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले. एसटीचा विचार करून वेळीच आंदोलन थांबविले असते तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविता आली असती. पण, त्याकडे दुर्लक्ष करून सदावर्ते यांनी आंदोलन चालूच ठेवले. यामुळे एसटीकडे प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी तोट्यात गेलीच. पण, त्यापेक्षाही प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते चार लाख रुपयापर्यंत नुकसान झाले, अशी टीकाही संदीप शिंदे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपHome Ministryगृह मंत्रालय