शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर; सांगलीत बालिकेचा खून-संशयित प्रियकरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:34 IST

अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी रखेलीच्या मुलीचा पोटात लाथ घालून खून करण्यात आला. पूर्वा संदीप काकडे (वय ५ वर्षे, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) असे या मृत मुलीचे नाव आहे

सांगली : अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी रखेलीच्या मुलीचा पोटात लाथ घालून खून करण्यात आला. पूर्वा संदीप काकडे (वय ५ वर्षे, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) असे या मृत मुलीचे नाव आहे. १८ जून रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना शुक्रवारी यश आले. याप्रकरणी सोन्या ऊर्फ सोहम शामराव भोसले (२७, रा. हनुमाननगर, दुसरी गल्ली, सांगली) यास अटक केली आहे.

पूर्वाची आई राणी व वडील संदीप काकडे या दोघांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना चार मुलीच झाल्या. मतभेदामुळे दोन वर्षांपासून हे विभक्त झाले. राणी तिच्या दीड, पाच, सहा व नऊवर्षीय अशा चार मुलींना घेऊन हरिपूर रस्त्यावर पाटणे प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये भाड्याने राहते. धुणी-भांडी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. संशयित सोन्या आचारीकाम करतो. एका कामाठिकाणी राणी भांडी धुण्यास गेली होती. तिथे या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. सोन्या नेहमी राणीच्या घरी येत असे. त्याला दारूचे व्यसनही होते. तो त्यावेळी राणीच्या मुली अजून जाग्याच असत. सोन्या त्यांना झोपविण्याचा प्रयत्न करत असे. मुली तोंडावर चादर घेऊन झोपेचा बहाणा करीत असत. ही बाब सोन्याला खटकत असे. यातून तो मुलींना मारहाण करीत असे.

सोन्या १८ जूनला रात्री नऊ वाजता राणीच्या घरी गेला होता. राणी तिच्या भावाकडे पैसे आणण्यास गेली होती. नेहमीप्रमाणे सोन्याने मुलींना झोपण्यास सांगितले. मुलीही तोंडावर चादर घेऊन झोपेचा बहाणा करू लागल्या. यात पूर्वा जास्त दंगा करू लागली. ‘सोन्याकाका, मला झोप येत नाही’, असे ती म्हणाली. याचा सोन्याला राग आला. त्याने पूर्वाच्या पोटात जोराची लाथ घातली. हा प्रकार पाहून तिच्या तीनही बहिणी घाबरल्या. त्या गुपचूप झोपल्या. पूर्वा विव्हळत पडली. सोन्याने तिला ‘मारहाण केलेली आईला सांगितलीस तर बघ’, अशी धमकी दिली. दहा वाजता पूर्वाची आई राणी आली. ती सोन्यासोबत बोलत बसली. पूर्वा झोपेतून उठून राणीकडे गेली. तिने डोळे पांढरे केल्याने राणीने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाºयांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.दोन महिन्यांपूर्वी चावाराणीच्या घरी रात्री गेल्यानंतर पूर्वा झोपत नसल्याने सोन्या तिच्यावर चिडून होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने पूर्वाच्या हाताचा चावा घेतला होता. हा प्रकार राणीला तसेच शेजाºयांना खटकला. त्यांनी सोन्याला येण्यास मज्जाव केला होता. महिनाभर तो राणीकडे फिरकला नाही. पण त्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल राणीची माफी मागितली. राणीनेही त्याला माफ केल्याने तो पुन्हा तिच्या घरी जाऊ लागला. त्याची मुलींवर प्रचंड दहशत होती. या दहशतीला घाबरूनच मुलींनी, त्याने पूर्वाच्या पोटात लाथ मारल्याचे सांगितले नव्हते. 

पोटात रक्तस्त्रावपूर्वाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तिच्या पोटाला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पथकाने तपासाला दिशा दिली. गेल्या चार दिवसांपासून अत्यंत गोपनीयपणे हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉटमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली. त्यावेळी घडलेला प्रकार समोर आला. सोन्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पूर्वाला मारल्याची कबुली दिली. याप्रकरणी पूर्वाचे वडील संदीप काकडे यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMurderखून