शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हल्लाबोल घागर मोर्चा : अधिकार्‍यांना धक्काबुक्की; शिव्यांची लाखोली

By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST

सांगली : शामरावनगरमधील अपुर्‍या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला.

सांगली : शामरावनगरमधील अपुर्‍या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला. घागरी घेऊन आलेल्या या महिलांनी अधिकार्‍यांना जाब विचारत धक्काबुक्की केली, शिव्यांची लाखोली वाहिली. काही महिला तर अंगावरही धावून गेल्या. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर पालिकेने दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र देऊन आपली सुटका करवून घेतली. शहरातील शामरावनगर परिसरातील विठ्ठलनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, शिवशक्ती कॉलनी या भागात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यात आज पाणीच न आल्याने या भागातील महिला व नागरिकांनी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा काढला. अचानक मोर्चा आल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी नसल्याने कनिष्ठ अभियंता, पाईप निरीक्षक यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाणी का आले नाही, असा जाब विचारत महिला व नागरिकांनी कर्मचार्‍यांना धारेवर धरले. निवडणुकीत या भागात पाणी येत होते, आता निवडणुका संपल्यावर पाणी बंद झाले आहे. पालिकेकडून पाण्याचे जादा बिल आकारले जाते. हे बिल आम्ही भरतो. मग पाणी का देत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तीच महिलांनी केली. कनिष्ठ अभियंता नूरमहंमद मुलाणी व पाईप निरीक्षक संतोष कुंभार यांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलांनी त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलाविल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. टँकरने पाणी पुरवठा करतो, असा पर्यायही पालिका कर्मचार्‍यांनी दिला. पण त्यालाही महिलांनी नकार दिला. टँकर नको, नळालाच पाणी आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. महिला व नागरिक अधिकच आक्रमक झाल्याने अखेर कर्मचार्‍यांनी मिरजेचे अभियंता बी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाणीपुरवठा कार्यालयात येण्याची विनंती केली. पाटील यांनीही महिलांशी चर्चा केली. अखेर दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र नागरिकांना देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. लेखी हमीनुसार पाणी आले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. या आंदोलनात माजी नगरसेवक आनंद परांजपे, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय लोखंडे, संभाजी भोसले, राजू थोरात, पूजा भोसले, मीना रावण, गिरमल पांगे, सुवर्णा आकोळे, विमल शिकलगार, अजित कोरबू, सिंधू रावण यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)