आटपाडी : येथील पाटील मळ्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिनीचे काम सुरू आहे. १५ व्या वित्त आयोगातून हे काम मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच वृषाली पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीनमधील पाटील मळा येथे जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आली होती, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे मोठी नवीन वाढीव पाईपलाईन करणे गरजेचे होते. आतापर्यंत नवीन वाढीव पाईपलाईन न केल्यामुळे पाटील मळा येथील ग्रामस्थांना पुरेसे पिण्याचे पाणी अनेक वर्षांपासून मिळत नव्हते. त्यामुळे आटपाडी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी ॲड. धनंजय पाटील, बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, विजय पाटील, मधुकर माळी उपस्थित होते.