शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

आटपाडीचा शाखा अभियंता निलंबित

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

शेततळ्यांतील घोटाळा प्रकरण : दोन उपकार्यकारी अभियंत्यांवरही चौकशीत ठपका

सांगली : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यातील पळसखेड येथील आठ शेततळ्यांची तपासणी केली. त्यापैकी चार लाभार्थींनी शेततळी न काढताच पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आटपाडी पंचायत समितीचे शाखा अभियंता आर. एन. मोमीन यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले आहे. मोमीन यांच्याकडून ७७ हजार, तर तत्कालीन दोन उपकार्यकारी अभियंत्यांकडे बोगस शेततळ्याचे ४८ हजार, अशी एकूण एक लाख २९ हजार रूपयांची वसुली लावली आहे. पळसखेड येथील आठ शेतकऱ्यांनी २००४-०५ या कालावधित रोजगार हमी योजनेतून बोगस शेततळी काढल्याची तक्रार माजी ग्रामविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांची नियुक्ती केली होती. पाटील यांनी चौकशी केली असता, पळसखेड येथील आठपैकी चार शेतकऱ्यांनी शेततळीच काढली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या चारही बोगस शेततळ्यांची एक लाख २९ हजारांची रक्कम होत असून, ती दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल होणार आहे. बोगस शेततळ्यांमध्ये आटपाडी पंचायत समितीचे शाखा अभियंता आर. एन. मोमीन दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. बोगस शेततळ्यांचे ७७ हजार मोमीन यांच्याकडून वसूल होणार आहेत. (प्रतिनिधी)दोघेजण दोषीबोगस शेततळ्यांप्रकरणी छोटे पाटबंधारे विभागाकडील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता आणि सध्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत असलेले जी. एस. पाटील आणि उपकार्यकारी अभियंता एन. ए. आडके यांना दोषी धरण्यात आले आहे. आडके सेवानिवृत्त झाले असून त्यांच्याकडून ४४ हजार आणि जी. एस. पाटील यांच्याकडून आठ हजार रूपयांची वसुली होणार आहे.आटपाडीत ६२ शेततळी बोगसआटपाडी तालुक्यात पळसखेडप्रमाणेच अन्य उंबरगाव, पुजारवाडी, खरसुंडी, तडवळे आदी गावांमध्येही ६२ बोगस शेततळी काढून शासनाचा निधी हडप केला आहे, अशी तक्रार माजी ग्रामविकास अधिकारी एस. एम. कुचेकर यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी रोजगार हमी योजनेकडील गटविकास अधिकारी विष्णू गेजगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. चौकशी अहवालानंतर अन्य दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.