शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

आटपाडी बाजार समिती देशमुख गटाकडेच

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

सतरा जागा जिंकल्या : काँग्रेससह बाबर गटाला प्रत्येकी एकच जागा; कार्यकर्त्यांचा जल्लोष

आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने १९ पैकी १७ जागा जिंकल्या. आमदार अनिल बाबर यांच्या गटाला व कॉँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.बाजार समितीची निवडणूक यावेळी प्रथमच तिरंगी झाली. त्यामुळे निकालाकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. उमेदवारनिहाय पडलेली मते आणि विजयी उमेदवार असे : प्राथमिक सेवा सहकारी संस्था (विकास संस्था) सर्वसाधारण गट- दिलीप रामचंद्र खिलारी- ४२२ मते, पोपट भगवान गायकवाड- ४२५, भाऊसाहेब भगवान गायकवाड- ४१८, मारुती बंडू गायकवाड- ४०७, सुबराव विठोबा ढगे- ४०१, ऋषिकेश बाळासाहेब देशमुख- ४२४, हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख- ४१९.कृषी प्रक्रिया किंवा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सह. संस्थांचा प्रतिनिधी गट- दादासाहेब तात्यासाहेब पाटील- २३८. प्राथमिक सेवा सहकारी संस्था (विकास संस्था) महिला प्रतिनिधी- संगीता गणपती खरात- ४५४, सुमन पांडुरंग विभुते- ४१९. हमाल व तोलाईदार प्रतिनिधी- अजयकुमार महादेव भिंगे- १०८. व्यापारी प्रतिनिधी - पंढरीनाथ भगवान नागणे- ४२८, सिध्देश्वर भानुदास मेनकुदळे- ४०८. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट- कुमार रावसाहेब चव्हाण- २११. ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- आनंदराव केशव ऐवळे- २१४. ग्रामपंचायत सर्वसाधारण गट- दादा एकनाथ पाटील- १८०, विजयकुमार सुभाष पुजारी- १८८. प्राथमिक सेवा सहकारी संस्था (विकास संस्था) भटक्या विमुक्त जाती-जमाती- विलास कृ ष्णा गलंडे- ४३०. प्राथमिक सेवा सह. संस्था (विकास संस्था) इतर मागास प्रवर्ग गट - जयवंत आनंदा गवळी- ४३१.बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. (वार्ताहर)उधळा गुलाल... फटाके फोडा!सकाळी पावणेआठला ‘हमाल व तोलाईदार प्रतिनिधी अजयकुमार भिंगे यांनी ११९ पैकी १०८ मते मिळवून विजय मिळविला आहे, उधळा गुलाल... फटाके फोडा...’ असा संदेश राजेंद्रअण्णा देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. तेव्हापासून संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत कार्यकर्ते गुलाल उधळतच राहिले. ग्रामपंचायत गटातून कॉँग्रेसच्या विजयकुमार पुजारी यांनी, तर शिवसेनेच्या आ. अनिल बाबर यांच्या गटाच्या कुमार चव्हाण यांनी विजय मिळविला. या दोन जागा वगळता सर्व जागांवर देशमुख गटाने विजय मिळविला. विशेष म्हणजे विकास सोसायटी गटातून कृष्णा मच्छिंद्र चव्हाण आणि सुरेश जगन्नाथ पडळकर या अपक्ष उमेदवारांना ८६८ मतांपैकी फक्त एकेक मत मिळाले.