शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अश्वारूढ शिवपुतळ्याची गडहिंग्लजला जंगी मिरवणूक

By admin | Updated: May 3, 2014 14:27 IST

महाराष्ट्र दिन आणि शिवजयंतीच्या औचित्यावर काढण्यात आलेली छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक अभूतपूर्व व ऐतिहासिकच ठरली.

गडहिंग्लज : तुतारी, लेझीम, ढोल-ताशा, झांजपथकाचा गजर आणि जय भवानी...जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी अवघी गडहिंग्लजनगरी शिवमय झाली होती. तब्बल तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवदेखील आवर्जून सहभागी झाले होते. महाराष्ट्र दिन आणि शिवजयंतीच्या औचित्यावर काढण्यात आलेली छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक अभूतपूर्व व ऐतिहासिकच ठरली.छत्रपती शिवाजी मराठा मंडळ व पुतळा प्रतिष्ठानतर्फे शहरातील दसरा चौकात बसविण्यात येणारा १५ फूट उंचीचा हा पुतळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला. खास रायगडावरून आणलेल्या जलकुंभांनी पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.वीरशैव बँक, नेहरू चौक, शिवाजी चौक, लक्ष्मी रोड, आयलँड, मुसळे कॉर्नर, एम. आर. हायस्कूल, आझाद रोड, शिवाजी बँक मार्गे दसरा चौकात आल्यानंतर पुतळ्याच्या चबुतर्‍याजवळ मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.मिरवणुकीत सभापती अमर चव्हाण, नगराध्यक्षा मंजूषा कदम, उपनगराध्यक्षा सुंदराबाई बिलावर, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, मराठा मंडळ व पुतळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कदम, विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, माजी आमदार संजय घाटगे, जि. प. सदस्य अप्पी पाटील, भिकाजीराव मोहिते, दत्ताजीराव बरगे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, दिलीप माने, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, ॲड. अर्जुन रेडेकर, युवराज पाटील, प्रकाश तेलवेकर, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. यशवंत कोले, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, आदींसह नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शिवप्रेमी, अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पावसाच्या व्यत्ययानंतरही शिवप्रेमींचा उत्साह कायम होता. (प्रतिनिधी)