शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यातील चोरट्याकडून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Updated: June 29, 2024 23:13 IST

त्याबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

घनशाम नवाथे, सांगली : सुरूल (ता. वाळवा) येथे घरफोडी केलेल्या संशयित राहुल प्रकाश माने (वय ३०, मूळ रा. इस्लामपूर, सध्या रा. दत्तवसाहत, आष्टा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, साड्या आणि दुचाकी असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेव्हा संशयित राहुल माने हा चोरीचा माल विक्री करण्यासाठी पेठनाका येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचला. तेवढ्यात दुचाकीवरून संशयित राहुल माने तेथे आला. पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर सोन्याची अंगठी, रोख सात हजार रूपये, १५ हजार रुपयांच्या साड्या असा मुद्देमाल मिळाला. त्याबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

कसून चौकशी केल्यानंतर काही दिवसांपूर्वी सुरूल गावात भरदिवसा घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. त्याला मुद्देमालासह इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत.सहायक निरीक्षक पंकज पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अंमलदार सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील, सूरज थोरात, विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, श्रीधर बागडी, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी