शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त

By admin | Updated: January 12, 2017 23:49 IST

चौकशी अधिकाऱ्यांचे आदेश : २८ जणांचा समावेश, दिग्गज नेत्यांना धक्का; २४७ कोटींचा घोटाळा

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी २३ माजी संचालक, मृत माजी संचालकांचे ३ वारसदार आणि दोन अधिकारी अशा २८ जणांच्या स्थावर मालमत्तांच्या जप्तीचे आदेश चौकशी अधिकारी अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांनी दिले. कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांचा यात समावेश असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले होते. दोषारोपपत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांची मालमत्ता विक्रीस काढली होती. वृत्तपत्रात त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली. भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार प्रकरणातील माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश गुरुवारी दिले. यासंदर्भातील आदेशाची प्रत रैनाक यांनी जिल्हा उपनिबंधकांसह महसुली अधिकाऱ्यांना दिली आहे. संबंधित मालमत्तांच्या विक्री, हस्तांतर, तारणगहाण, भाडेपट्टी अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला मनाई करण्यात आली आहे. या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, मालमत्ता अभिलेखात प्राधिकृत चौकशी अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अशी नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत. नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र चौकशीपूर्वी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणांना वगळण्यात आले. परिणामी चौकशीतून चार माजी संचालकांना वगळण्यात आले आहे. निर्णय प्रक्रियेत नसलेल्या ७३ पैकी ६९ कर्मचाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांनी, तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वगळले आहे. कर्मचाऱ्यांपैकी आता केवळ दोनच अधिकाऱ्यांवर आरोप ठेवले आहेत. (प्रतिनिधी)चौकशीतील रकमा...कलम ७२ (२) नुसार झालेल्या चौकशीत २८६ खातेदारांच्या ३६४ कोटी २0 लाख ५७ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांवर आक्षेप होते. कलम ७२ (३) मधील चौकशीवेळी पाच वर्षापेक्षा जुन्या असलेल्या ६५ खात्यांची ५७ कोटी ८ लाख ५४ हजाराची कर्जप्रकरणे वगळली गेली. चौकशीदरम्यान वसुली होऊन ५९ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांची ११४ खाती बंद झाली. ७२ (३) प्रमाणे आता १0७ खात्यांच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शिल्लक आहे. यांच्या मालमत्ता केल्या जप्त... नाव मालमत्तेचे ठिकाणजयश्रीताई मदन पाटील कवलापूर, पद्माळे, सांगलीशशिकांत कलगोंडा पाटील अंकली नरसगोंडा सातगोंडा पाटील नांद्रेसुरेश आदगोंडा पाटील सांगलीअमरनाथ सदाशिव पाटील कुपवाड, पद्माळे, माधवनगरकिरण राजाभाऊ जगदाळे सांगलीमाधवराव ज्ञानदेव पाटील अंकलखोपतुकाराम रामचंद्र पाटील कवठेपिरानसुरेश देवाप्पा आवटी मौजे डिग्रजप्रमिलादेवी प्रकाशराव मानेकुपवाड, आंधळीसुभाष गणपती कांबळे मणेराजुरी दादासाहेब वाघू कांबळे मौजे डिग्रज निवृत्तीराव मारुती पाटील नागजश्रीमती प्रेमा सतीश बिरनाळे सांगली जंबू दादा थोटेआष्टा, सांगली भरत महादेव पाटीलबुधगाव बेबीताई मारुती पाटील मौजे डिग्रज निवास दत्ताजीराव देशमुख शिराळादत्तात्रय श्रीपती सूर्यवंशी अंकलखोप सुधाकर धोंडीराम आरते कसबे डिग्रज गजानन लक्ष्मणराव गवळी खंडेराजुरी, पेठभाग सांगली सर्जेराव सखाराम पाटील शेरी कवठेसुरेश जिनगोंडा पाटील समडोळीअरविंद शामराव पाटील पद्माळे श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे मौजे डिग्रज आनंदराव मारुती पाटील सांगलीवाडीभूपाल दत्तात्रय चव्हाण कुपवाड, सांगलीप्रकाश बाबूराव साठे तासगाव