शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

ग्रामीणचा टक्का वाढल्याने चिंता विधानसभा निवडणूक :

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

सांगली मिरज क्षेत्रातील टक्का झाला कमी, आकड्यांवर व्यक्त केले जाताहेत अंदाज

सांगली : महापालिका क्षेत्रातील मतांचा टक्का घटला असतानाच ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मतांचा टक्का वाढल्याने अनेकांना चिंता लागली आहे. मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि तोट्याचा यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मतांचा टक्का वाढावा म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले होते. ग्रामीण भागातून त्याप्रमाणे टक्का वाढला असला तरी, या वाढलेल्या व कमी झालेल्या टक्केवारीवर निकालाचे गणित मांडले जात आहे. मतदानाची प्रक्रिया बुधवारी पार पडल्यानंतर मतांच्या अंतिम आकड्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली. जिल्ह्यातील आठपैकी सांगली व मिरज या दोनच मतदारसंघात साठ टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. उर्वरित सर्वच मतदारसंघात ६५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. यातही ग्रामीण भागातील मतांचे आकडे मोठे आहेत. मतदानाच्या आकडेवारीची तुलना गत निवडणुकीतील आकड्यांशी केली जात आहे. बहुतांश मतदारसंघातील मतदानाचे आकडे यंदा वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला त्याचा फटका बसणार, याची चर्चा आता रंगलेली आहे. अशा गणिताला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी, त्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते. यंदाही त्यापद्धतीने सुरू आहे. पारंपरिक अंदाज व्यक्त करण्याच्या गावोगावी आणि गल्लोगल्ली अशाचप्रकारच्या चर्चांना आता ऊत आला आहे. आकडेवारीवरून आता पैजाही लावल्या जात आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मतदानाच्या आकडेवारीत २.५५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तुलनेने गतवेळेपेक्षा मतदानाचा टक्का घटलेल्या मतदारसंघात मिरज आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली होती. त्याचा परिणामही ग्रामीण भागात जाणवला. (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी मतदारसंघ२००९ मध्ये २०१४ मध्ये सांगली५८.७६५९.११ शिराळा७७.४७७८.८७ तासगाव-क. म.६३.४४७६.६१ पलूस-कडेगाव७८.००८१.६४ मिरज६२.७३६१.३० खानापूर६७.५१७३.१४ इस्लामपूर७५.५९७२.०३ जत६६.००६८.0८ एकूण६८.६८७०.८४ सर्वाधिक मतदान पलूस-कडेगावमध्ये मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पलूस-कडेगावने मतदानात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. याठिकाणी ८१.६४ टक्के मतदान झाले आहे. यात १ लाख ७ हजार २0५ पुरुषांनी तर ९९ हजार ८५८ महिलांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदले गेले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ही उर्वरित सात मतदारसंघापेक्षा अधिक आहे. याठिकाणची एकूण मतदारसंख्या ३ लाख २८ हजार ३७0 इतकी आहे. तरीही सांगलीत केवळ ५९ टक्के मतदान झाले. मिरजेतही कमी मतदानाची नोंद झाली. मिरजेची एकूण मतदारसंख्या ३ लाख १ हजार ४३७ इतकी आहे. सांगलीनंतर सर्वाधिक मतदारसंख्या मिरजेत आहे. तरीही मिरजेत ६१.३0 टक्के मतदान झाले. महापालिका क्षेत्रातील मोठा भाग या दोन्ही मतदारसंघात येतो. शहरी चेहरा असलेल्या या मतदारसंघात मतदानाबाबतची उदासीनता स्पष्टपणे दिसून आली. मिरजेत ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान मिरज : मिरज विधानसभेसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के व मिरज शहरात केवळ ५५ टक्के मतदान झाले. शहरात मतदान कमी झाल्याने त्याचा कोणाला फटका बसणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभेसाठी पंचरंगी लढत असतानाही शहरात मतदान कमी झाले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग यासह अन्य गावांत चुरशीने ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारीही कमी झाल्याने त्याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार, याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. शहरात सुमारे सव्वालाख मतदार आहेत. ग्रामीण व शहरातील मतदानाच्या आकडेवारीमुळे कौल कुणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)