ओळी : शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वग्याणी यांच्या शोकसभेत बोलताना झुंजारराव पाटील, अभिजित वग्यानी, दिलीप वग्याणी, वीर कुदळे, जगन्नाथ बसूगडे, अशोक शिंदे, सुरेश चौगुले आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक व शिवशक्ती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव वग्याणी यांनी आष्ट्याच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांनी स्वकर्तृत्वाने शहराचे नाव मोठे केले, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी केले.
वग्याणी यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त आयोजित शोकसभेत पाटील बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी म्हणाले, ‘सर्वोदय’च्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पश्चात अभिजित वग्याणी यांच्या पाठीशी सर्वांनी राहावे.
विराज शिंदे म्हणाले, सहकार पंढरीत निष्ठेने काम करीत लोकांचे आर्थिक प्रश्न सोडवले व प्रगती साधली. समीर गायकवाड म्हणाले, अशोक वग्याणी आयुष्यभर तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले. चळवळीत काम करताना त्यांनी माजी आमदार संभाजी पवार, व्यंकप्पा पत्की, शरद पाटील यांच्यासोबत विकासाला चालना दिली.
यावेळी ॲड. अभिजित वग्याणी, उपाध्यक्ष कृष्णराव कुंभार, सचिव सुरेश कुंभार, सुरेश चौगुले, श्रद्धा लांडे, इंदुमती मगदूम, अनुजा चौगुले, पद्मजा वग्याणी, अनिल पाटील, दीपक पाटील, वीर कुदळे, जगन्नाथ बसुगडे, अशोक शिंदे उपस्थित होते.