आष्टा : आष्ट्याच्या उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांनी नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे राजीनामा दिला. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे व माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांनी राजीनामा दिला.
आष्टा पालिकेवर माजी आमदार विलासराव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता आहे. उपनगराध्यक्षपद दुसऱ्या व चौथ्या वर्षी जयंत पाटील गटाकडे तर पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या वर्षी शिंदे गटाकडे असा अलिखित करार आहे. त्यानुसार पाचव्या वर्षी तेजश्री बोंडे यांच्यानंतर शिंदे गटाच्या प्रतिभा पेटारे यांना उपनगराध्यक्षा पदाची संधी मिळाली. पेटारे यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटातून ज्येष्ठ नेते शेरनवाब देवळे, धैर्यशील शिंदे तसेच शारदा खोत यांची नावे चर्चेत आहेत. शिंदे गटातून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
फोटो : आष्टा येथे उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे सोपवला. यावेळी तेजश्री बोंडे व आनंदा कांबळे उपस्थित होते